मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) शनिवारी टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडून सर्वांना धक्का दिला आहे. त्याने यापूर्वी टी20 प्रकारातील कॅप्टनसी स्वत:हून सोडली होती. तर वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून त्याला हटवण्यात आले होते. मात्र टेस्टमध्ये त्याचा रेकॉर्ड सर्वात सरस होता. तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टनपैकी एक आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्धची सीरिज 1-2 या फरकानं गमावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराटनं हा निर्णय जाहीर केल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विराटनं या निर्णयाबाबतची कल्पना टीम इंडियातील सहकाऱ्यांना 24 तास आधीच दिली होती, असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिले आहे. केपटाऊन टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर त्याने या निर्णयाची माहिती सर्व सहकाऱ्यांनी दिली. तसेच ही बातमी सध्या स्वत:जवळच ठेवा. याची ड्रेसिंग रूमच्या बाहेर वाच्यता करू नका,’ अशी विनंती विराटने केल्याचे वृत्त आहे. भारतीय क्रिकेटला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी 7 वर्ष कठोर मेहनत अथक प्रयत्न केले. मी माझं काम पूर्ण इमानदारीने केलं. एकाठिकाणी येऊन प्रत्येकाला थांबावं लागतं. माझ्यासाठीही आता टेस्ट कॅप्टन म्हणून वेळ आली आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण माझ्या प्रयत्नांमध्ये आणि आत्मविश्वासात कधीच कमी आलेली नाही. मी नेहमीच 120 टक्के देण्यावर विश्वास ठेवतो. मला जर काही गोष्टी करणं जमत नसेल, तर मला जाणवतं की हे करणं योग्य नाही. मी माझ्या टीमसाठी कधीच बेईमानी करणार नाही,’ असं सोशल मीडियावर जाहीर करत विराटने कॅप्टनसी सोडली.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
कोहली भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने 68 पैकी 40 टेस्ट जिंकल्या. यानंतर धोनीने 60 पैकी 27 टेस्ट जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा विराट हा पहिला आशियाई कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्येही टेस्ट सीरिज जिंकली. इंग्लंडमधील पाच टेस्टची सीरिज कोरोनामुळे स्थगित होण्यापूर्वी त्यामध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. तर विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारताने मायदेशात एकही टेस्ट सीरिज गमावली नाही. विराटच्या निर्णयानंतर फॅन्सचा गांगुलीवर निशाणा, सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया