मुंबई, 9 फेब्रुवारी : आयपीएल 2022 साठी (IPL 2022) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये 10 टीम खेळणार आहेत. या टीमनं 33 खेळाडूंना रिटेन केले आहे. आगामी आयपीएलमध्ये 15 देशातील 590 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यापैकी 200 खेळाडूंची वेगवेगळ्या टीममध्ये निवड होऊ शकते. त्यापैकी कोणत्या खेळाडूंना किती रक्कम मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही भारतीय खेळाडू आयपीएलमुळे सुदैवी ठरले आहेत. त्यांना टीम इंडियात फार संधी मिळालेली नाही. पण, त्यांना आयपीएलनं मालामाल केलं आहे. यामध्ये सर्वात प्रमुख नाव फास्ट बॉलर जयदेव उनाडकतचं (Jaydev Unadkat) आहे. उनाडकतनं टीम इंडियाकडून एक टेस्ट, 7 वन-डे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. त्याला गेल्या 4 वर्षात टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही. पण, त्याचा आयपीएलमधून होणाऱ्या कमाईमध्ये काही फरक पडलेला नाही. त्याने आत्तापर्यंत 36 कोटींची कमाई केली आहे. उनाडकतसह असे 5 खेळाडू आहेत ज्यांना टीम इंडियात फार संधी मिळाली नाही. पण त्यांनी 150 कोटींची कमाई केली आहे. 34 वर्षांचा लेग स्पिनर कर्ण शर्मा (Karan Sharma) 8 वर्षांपासून भारतीय टीममधून बाहेर आहे. तो 2014 साली टीम इंडियाकडून शेवटचं खेळला आहे. त्यानं आजवर एक टेस्ट, 2 वन-डे आणि एक टी20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. पण, आयपीएल स्पर्धेतील पगारातून त्यानं 35 कोटींची कमाई केली आहे. ऑफ स्पिनर कृष्णप्पा गौतमनं (Krishnappa Gowtham) भारताकडून फक्त 1 वन-डे सामना खेळला आहे. पण, त्यानं आयपीएलमधून 30 कोटी कमावले आहेत. Ashes सीरिजमधील पराभवाचे पडसाद, इंग्लंड टीममधून 3 दिग्गजांची हकालपट्टी कर्नाटकच्या करूण नायरनं (Karun Nair) टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावलं आहे. त्यानं टीम इंडियाकडून 6 टेस्ट आणि 2 वन-डे सामने खेळले आहेत. नायरनं शेवटचा आंतरराष्ट्राय सामना 5 वर्षांपूर्वी खेळला आहे. त्याने आयपीएलमधून 27 कोटी कमावले आहेत. तर मुंबई इंडियन्सचा खेळाडू सौरभ तिवारीनं (Saurabh Tiwary) टीम इंडियाकडून 12 वर्षांपूर्वी 3 वन-डे सामने खेळले आहेत. त्यानंतरही त्याला आयपीएल स्पर्धेतून आजवर 27 कोटी रूपये मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.