मुंबई, 27 जानेवारी : भारत विरूद्धच्या वन-डे मालिकेसाठी वेस्ट इंडिज टीमची घोषणा (India vs West Indies) करण्यात आली आहे. 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 3 सामन्यांची ही मालिका होणार आहे. 15 सदस्यीय टीमचे नेतृत्त्व मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑल राऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) करणार आहे.या टीममध्ये तीन जणांचे पुनरागमन झाले.
वेस्ट इंडिजच्या निवड समितीनं अनुभवी फास्ट बॉलर केमार रोच (Kemar Roach) मिडल ऑर्डर बॅटर एनक्रुमाह बोनर (Nkrumah Bonner) आणि ओपनर ब्रँडन किंग (Brendon King) यांचा समावेश केला आहे. यापैकी रोचची निवड ही सर्वाधिक लक्षवेधी आहे. रोचच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये 124 विकेट्स आहेत. त्याचा 2019 नंतर पहिल्यांदाच टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
'केमार रोच हा आमचा मुख्य फास्ट बॉलर आहे. सुरूवातीला विकेट मिळवू शकेल अशा बॉलरची आम्हाला गरज आहे. 5 च्या इकोनॉमी रेटनं बॉलिंग करणारा रोच हा उत्तम पर्याय आहे.' असे मत वेस्ट इंडिजच्या निवड समितीचे अध्यक्ष डेसमंड हेन्स यांनी व्यक्त केले आहे.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूनं काढले 14 बॉलमध्ये 76 रन, आयपीएल लिलावात होणार मालामाल
वेस्ट इंडिजची वन-डे टीम : कायरन पोलार्ड (कर्णधार), केमार रोच, एनक्रुमाह बोनर, ब्रँडन किंग, फॅबियन एलेन, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाइ होप, अकील हुसेन, अलझारी जोसेफ, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनिअर
भारताची वन-डे टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान
भारताची टी20 टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Team india, West indies