मुंबई, 27 जानेवारी : वेस्ट इंडिजनं तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडचा (West Indies) 20 रननं पराभव केला आहे. या विजयाबरोबर वेस्ट इंडिजनं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या मिडल ऑर्डरचा खेळाडू रोवमॅन पॉवेल (Rovman Powell) या विजयाचा हिरो ठरला. त्याने दमदार शतक झळकाले. पॉवेलच्या शतकामुळे वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 224 रन केले. त्याला उत्तर देताना इंग्लंडची टीम 9 आऊट 204 रनच करू शकली. इऑन मॉर्गनच्या (Eoin Morgan) अनुपस्थितीमध्ये मोईन अली (Moeen Ali) या मॅचमध्ये इंग्लंडचा कॅप्टन होता. त्याने टॉस जिंकत पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली. त्यांच्या दोन विकेट्स झटपट गेल्या, त्यानंतर पॉवेल आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran) यांची जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 रनची भागिदारी केली. पूरन 43 बॉलमध्ये 70 रन काढून आऊट झाला.
What Entertainment. What a win. We go 2-1 up in this five-match Betway series against the #1 ranked T20I in the world! #MenInMaroon #WIVibes #WIvENG pic.twitter.com/5LvvJvzBo0
— Windies Cricket (@windiescricket) January 27, 2022
पॉवेलनं त्यानंतर शतक झळकावले. त्याने टी20 इंटरनॅशनलमधील पहिलं शतक 51 बॉलमध्ये पूर्ण केले. पॉवेलनं 53 बॉलमध्ये 107 रन केले. या खेळीत त्यानं 4 फोर आणि 10 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्याने फक्त 14 बॉलमध्ये 76 रन काढले. आयपीएल लिलावापूर्वी (IPL 2022 Mega Auction) झळकावलेल्या या शतकाचा पॉवेलला फायदा होणार आहे. IND vs WI : पांड्याशी झालेल्या पंग्यानं बदललं आयुष्य, रोहित-द्रविडनं दिली संधी इंग्लंडकडून 225 रनचा पाठलाग करताना टॉम बँटन (73) आणि फिल साल्ट (57) यांनी अर्धशतक झळकावले. त्यांचे अर्धशतक टीमचा पराभव टाळू शकले नाहीत. कॅप्टन मोईन अलीनं साफ निराशा केली. तो शून्यावर आऊट झाला. या सीरिजमधील पहिली मॅच वेस्ट इंडिजने 9 विकेट्सनं जिंकली होती. तर दुसऱ्यामध्ये इंग्लंडनं 1 रननं निसटता विजय मिळवला होता.