Home /News /sport /

IND vs WI : IPL मध्ये मोठी कमाई आता टीम इंडियाचं तिकीट, 21 वर्षांचा बॉलर का खास आहे?

IND vs WI : IPL मध्ये मोठी कमाई आता टीम इंडियाचं तिकीट, 21 वर्षांचा बॉलर का खास आहे?

21 वर्षांचा युवा लेग स्पिनर रवी बिष्णोईला (Ravi Bishnoi) देखील वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन-डे आणि टी 20 टीममध्ये निवडण्यात आले आहे.

    मुंबई, 27 जानेवारी : टी20 वर्ल्ड कप आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात स्पिन बॉलर्सच्या निराशाजनक कामगिरीचा टीम इंडियाला फटका बसला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तर भारतीय टीमचा (India vs South Africa) 0-3 असा पराभव झाला. भारतीय स्पिनर्स या मालिकेत अपयशी ठरले. या मालिकेत आर. अश्विन, युजवेंद्र चहल आणि जयंत यादव यांनी एकूण 59 ओव्हर्स बॉलिंग केली. त्यामध्ये त्यांना एकत्रित फक्त 3 विकेट्स मिळाल्या. टीम इंडिया 11 ते 40 ओव्हर्स या कालखंडात मागे पडत असल्याचं हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मान्य केले आहे. त्यामुळेच आता नव्याने रणनीती तयार केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून सहा महिन्यांनी कुलदीप यादवचं (Kuldeep Yadav) टीममध्ये पुनरागमन झाले आहे. कुलदीपनं मिडल ओव्हर्समध्ये सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 21 वर्षांचा युवा लेग स्पिनर रवी बिष्णोईला (Ravi Bishnoi) देखील वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन-डे आणि टी 20 टीममध्ये निवडण्यात आले आहे. रवी बिष्णोईने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून उल्लेखनीय कामगिरी केली. यंदाच्या आयपीएल मोसमात बिष्णोई लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल. त्याला लखनऊच्या टीमनं आयपीएलच्या  लिलावापूर्वी 4 कोटींमध्ये करारबद्ध केले आहे. रवीने 2 वर्षांपूर्वी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने त्या स्पर्धेतील 6 मॅचमध्ये सर्वात जास्त 17 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला पंजाब किंग्ज (Punjab Kings) बेस प्राईजच्या 10 पट जास्त म्हणजेच 2 कोटींना कराबद्ध केले होते. टीम इंडियात पुन्हा 'कुलचा' एकत्र, वाचा 6 महिन्यांनी का आठवला कुलदीप? रवी बिष्णोई पहिल्याच आयपीएलमध्ये पंजाबच्या टीमचा मुख्य स्पिनर बनला. त्याने 2020 मधील 14 मॅचमध्ये 31.33 च्या सरासरीनं 12 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएल 2020 मध्ये त्याने प्रत्येक 25 बॉलनंतर एक विकेट घेतली होती.  त्यानंतरच्या एका वर्षात त्याच्या बॉलिंगमध्ये मोठी सुधारणा झाली. आयपीएल 2021 मधील 9 मॅचमध्ये त्याने 19.16 च्या सरासरीनं 12 विकेट्स घेतल्या. या सिझनमध्ये त्याचा इकोनॉमी रेट 6.38 इतका होता. जो आयपीएल 2020 मधील 7.37 पेक्षा कमी होता. तसेच त्याने मागील आयपीएलमध्ये दर 18 बॉलनंतर एक विकेट घेतली आहे. टीम इंडियाच्या निवडीचे Twitter वर पडसाद, पांड्याचे अकाऊंट हॅक बिष्णोई का आहे खास? रवी बिष्णोई आधी फास्ट बॉलर होता. त्यानंतर कमी उंचीमुळे तो लेग स्पिनर बनला. आजही त्याचा रन अप फास्ट बॉलरसारखा आहे. त्यामुळे त्याचा बॉल अधिक वेगाने येतो. अन्य बॉलर्सपेक्षा त्याचा गुगली अधिक धोकादायक आहे. कारण, गुगली खेळण्यासाठी बॅटरनं बॅट खाली येईपर्यंत त्याची दांडी उडालेली असते. अफगाणिस्तानच्या राशिद खानमध्ये देखील हीच खासियत आहे. त्यामुळेच बिष्णोईला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ravi bishnoi, Team india

    पुढील बातम्या