मुंबई, 27 जानेवारी : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वन-डे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. निवड समितीनं बुधवारी रात्री उशीरा दोन्ही मालिकेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या निवडीनंतर ऑल राऊंडर कृणाल पांड्याचे (Krunal Pandya) ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे.
कृणालच्या ट्विटर अकाऊंटवरून गुरूवारी सकाळपासून विचित्र मेसेज येत आहेत. त्यावरून हे अकाऊंट हॅक झाल्याचे स्पष्ट होत आहे. क्रिकेट फॅन्सनी या सर्व प्रकरणाचा दीपक हुडाच्या (Deepak Hooda) निवडीशी कनेक्शन जोडले आहे. दीपक हुडाची पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. त्याला वन-डे टीममध्ये जागा मिळालीय. मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या सुरूवातील कृणाल आणि दीपकचा वाद झाला होता.
काय झाला होता वाद?
बडोदा टीमचा उपकर्णधार दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून माघार घेतली होती. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya)सोबत भांडण झाल्यामुळे हुडाने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घ्यायचा निर्णय घेतला. कृणाल पांड्याने आपल्याला शिव्या दिल्या, त्यामुळे आपण स्पर्धेतून माघार घेत आहोत, असा आरोप दीपक हुडाने केला होता.
IND vs WI : भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज टीमची घोषणा, 3 जणांचे पुनरागमन
कृणाल पांड्याने आपल्याला सरावापासून रोखलं आणि आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा दावा दीपक हुडाने केला होता. याबाबत त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ई-मेलही लिहिला, ज्यात त्याने कृणाल पांड्याबाबत तक्रार केली. कृणाल पांड्याने शिव्या दिल्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून माघार घेत असल्याचं त्याने जाहीर केलं. त्यानंतर हुडानं बडोद्याची टीम सोडून राजस्थानकडून खेळण्याचा निर्णय घेतला. या सिझनपूर्वी दीपक हुडा तब्बल 11 वर्ष बडोद्याकडून खेळत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.