Home /News /sport /

IND vs WI : टीम इंडियात पुन्हा 'कुलचा' एकत्र, वाचा 6 महिन्यांनी का आठवला कुलदीप?

IND vs WI : टीम इंडियात पुन्हा 'कुलचा' एकत्र, वाचा 6 महिन्यांनी का आठवला कुलदीप?

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ही टीम इंडियाच्या स्पिनर्सची जोडी पुन्हा एकदा मैदानात एकत्र उतरण्यासाठी सज्ज आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी (India vs West Indies) या दोघांची निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जानेवारी : कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल  (Yuzvendra Chahal) ही टीम इंडियाच्या स्पिनर्सची जोडी पुन्हा एकदा मैदानात एकत्र उतरण्यासाठी सज्ज आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी (India vs West Indies) या दोघांची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे. कुलदीप यादवनं 6 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन केले आहे. त्याची निवड करत बीसीसीआयनं पुन्हा एकदा मनगटानं बॉल वळवणाऱ्या स्पिनरवर विश्वास दाखवला आहे. कुलदीप-चहल म्हणजेच 'कुलचा' जोडीने 2017 ते 2019 या काळात वन-डे आणि टी20 क्रिकेटमध्ये दरारा निर्माण केला होता. 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर ही जोडी तुटली. भारतीय टीममधून सातत्याने बाहेर असलेल्या कुलदीपला आयपीएल टीममध्ये संधी मिळाली नाही. त्याला आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) बेंचवरच बसवलं. कुलदीप वन-डे क्रिकेटमध्ये 20 ते 40 ओव्हर्सच्या दरम्यान विकेट घेण्यात सर्वांच्या पुढे आहे. भारतीय टीम सध्या या ओव्हर्समेध्ये विकेट घेण्यासाठी संघर्ष करत आहे. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर केएल राहुलनं ही बाब उघडपणे मान्य केली होती. या अडचणीवर मात करण्यासाठीच कुलदीपची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. कुलदीप यादवनं आजवर 7 टेस्ट, 65 वन-डे आणि 23 टी20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये अनुक्रमे 26, 107 आणि 41 विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलनं 59 वन-डेमध्ये 99 तर 50 टी20 इंटरनॅशनलमध्ये 64 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानात खेळणाऱ्या 6 खेळाडूंची IPL Auction वर नजर, एकाला मिळाले आहेत 15 कोटी भारताची वन-डे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान टी20 टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Kuldeep yadav, Team india, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या