Home /News /sport /

पाकिस्तानात खेळणाऱ्या 6 खेळाडूंची IPL Auction वर नजर, एकाला मिळाले आहेत 15 कोटी

पाकिस्तानात खेळणाऱ्या 6 खेळाडूंची IPL Auction वर नजर, एकाला मिळाले आहेत 15 कोटी

पाकिस्तान सुपर लीगला (PSL 2022) शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या बाहेरचे खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. त्यांची नजर ही पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल मेगा ऑक्शनवर (IPL 2022 Mega Auction) आहे.

    मुंबई, 27 जानेवारी :  पाकिस्तान सुपर लीगला (PSL 2022) शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या बाहेरचे खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. त्यांची नजर ही पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल मेगा ऑक्शनवर (IPL 2022 Mega Auction) आहे. पीएसएलमध्ये चांगलं खेळून आयपीएलमधील 10 टीमना प्रभावित करण्यावर त्यांचा भर असेल. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानदेखील  (Rashid Khan)  आयपीएल खेळणार आहे. त्याला अहमदाबादच्या टीमनं 15 कोटी रूपयांमध्ये करारबद्ध केले आहे. त्याशिवाय पीएसएल खेळणारे आणखी कोणते खेळाडू आयपीएलमध्ये दिसू शकतात ते पाहूया इंग्लंडचा ओपनर अ‍ॅलेक्स हेल्स (Alex Hales)  इस्लामाबादच्या टीमकडून खेळत आहे. त्याचा टी20 क्रिकेटमधील रेकॉर्ड दमदार आहे. तो यापूर्वी 2018 साली आयपीएलमध्ये खेळला होता. त्या सिझनमध्ये त्याने 6 मॅचमध्ये 148 रन काढले होते. हेल्सनं त्याच्या टी20 कारकिर्दीमध्ये 324 मॅचमध्ये 9116 रन काढले होते. यामध्ये 5 शतक आणि 55 अर्धशतकांचा समावेश आहे.तसेच हेल्सचा स्ट्राईक रेच हा 146 आहे. इंग्लंडचा लियम लिविंगस्टोन देखील आयपीएलमध्ये खेळू शकतो. लिविंगस्टोननं 151 इनिंगमध्ये 4038 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 145 आहे. तसंच तो लेग स्पिनर देखील असून त्याने 63 विकेट्स घेतल्या आहेत. एक ऑलराऊंडर म्हणून त्याच्यावर चांगली बोली लागू शकते. रवी शास्त्रींकडे अजूनही नाही धोनीचा नंबर, माजी कोचनं सांगितलं कारण! VIDEO त्याचबरोबर जो क्लार्क, फिल सॉल्ट आणि जेम्स विन्सी देखील चांगली कामगिरी करून आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहेत. 30 वर्षांच्या विन्सीनं 269 इनिंगमध्ये 7313 रन केले आहेत. यामध्ये 44 अर्धशतकांचा समावेश असून त्याचा स्ट्राईक रेट 133 आहे. पाकिस्तान सुपर लीगचा हा सातवा सिझन आहे. या सिझनमध्ये 6 टीममध्ये 34 सामने खेळले जातील. फायनल मॅच 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022 auction, Pakistan

    पुढील बातम्या