मुंबई, 15 डिसेंबर : टीम इंडियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वांच्या विषयांवर उत्तर दिली आहेत. या पत्रकार परिषदेत त्यानं वन-डे टीमची कॅप्टनसी सोडण्यासाठी निवड समितीनं किती वेळ दिला याचे उत्तर दिले आहे. निवड समितीने फक्त दीड तास आधी आपल्याला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात येणार असल्याचा खुलासा विराटने या पत्रकार परिषदेत केला आहे. ‘मला निवड समितीच्या सदस्यांनी बैठक सुरू होण्यापूर्वी दीड तास आधी संपर्क केला होता. त्यावेळी आम्ही टेस्ट टीमच्या निवडीबाबत चर्चा केली. त्यानंतर तू आता वन-डे टीमचा कॅप्टन नाहीस असे मला निवड समिचीच्या अध्यक्षांनी सांगितले. मी तो निर्णय मान्य केला.’ असे विराटने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. विराट कोहली वन-डे टीमचे कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हता. हे पद सोडण्यासाठी निवड समितीने त्याला 48 तासांची मुदत दिली होती. त्यानंतरही त्याने हे पद सोडले नाही म्हणून त्याची हकालपट्टी करण्यात आली, अशी क्रिकेट विश्वात चर्चा होती. विराटने त्यावर स्पष्टीकरण देत त्याची बाजू मांडली आहे. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिजनंतर (India vs South Africa Test Series) ब्रेक घेणार आहे. वन-डे सीरिज खेळणार नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विराटने या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. IND vs SA: दक्षिण आफ्रिकेनं दौरा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला दिली Good News ‘या प्रकारचे वृत्त लिहिणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या सूत्रांनी तुम्ही हे प्रश्न विचारा. ही सर्व मंडळी विश्वासर्ह नाहीत. मी नेहमीच वन-डे सीरिजच्या निवडीसाठी उपलब्ध आहे. यापूर्वी देखील उपलब्ध होतो.’ या शब्दात विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन-डे सीरिज खेळणार नसल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







