मुंबई, 15 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत सध्या ओमिक्रॉनचा (Omicron) गंभीर धोका आहे. ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला जाणार का? हा प्रश्न निर्माण झाला होता. भारतीय टीमचा दक्षिण आफ्रिका दौरा पुढे ढकलण्यात आला पण रद्द झाला नाही. आता सुधारित वेळापत्रकानुसार टीम इंडिया गुरूवारी दक्षिण आफ्रिकेला (India tour of South Africa) रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.
टीम इंडियाला कोरोनाचा कडक प्रोटोकॉल पाळण्याची गरज नाही. भारतीय टीमला फक्त 1 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल. त्या दिवसभरात खेळाडूंच्या तीन टेस्ट होतील. या सर्व टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर खेळाडूंना आयसोलेशनच्या बाहेर येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी तीन दिवस मुंबईत क्वारंटाईन आहे.
'इनसाईड स्पोर्ट्स'ने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडिया गुरुवारी चार्टड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. तिथे दाखल होताच सर्व खेळडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. या कालानधीमध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तेथील सर्व स्टाफची देखील नियमित टेस्ट केली जाणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार हा दौरा 17 डिसेंबर रोजी सुरू होणार होता. पण नंतर ओमिक्रॉनमुळे तो लांबणीवर टाकण्यात आला. आता पहिली टेस्ट 26 डिसेंबर रोजी होणार आहे.
विराट सोडणार मौन
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेल्या गोंधळाचा केंद्रबिंदू असलेला विराट या सर्व प्रश्नांवर अखेर मौन सोडण्याची शक्यता आहे. टीम इंडिया गुरूवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यापूर्वी विराट कोहली मुंबईत आज (बुधवार) मीडियाला सामोरं जाणार असून त्यावेळी तो त्याच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.
पुन्हा मौका-मौका! World Cup 2022 मध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, पाहा संपूर्ण वेळापत्रक
विराट कोहली आणि बीसीसीआय, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील संबंध सध्या कसे आहेत यावर विराटकडून उत्तरं मिळतील, अशी फॅन्सना आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, South africa, Team india