मुंबई, 5 जून : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांच्यातील सामना क्रिकेट विश्वात प्रसिद्ध होता. शोएब अख्तर नेहमीच सचिनला जास्त वेगानं आणि अधिक अचूक बॉलिंग टाकत असे. अख्तरच्या फास्ट बॉलिंगची सचिननं अनेकदा धुलाई केली आहे. 2003 मधील वर्ल्ड कप हे याचं प्रमुख उदाहरण आहे. सचिनला जखमी करण्यासाठी आपण बॉलिंग केली होती, असा खुलासा अख्तरनं केला आहे.
शोएब अख्तरनं 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलताना पहिल्यांदाच हे रहस्य उलगडत असल्याचं सांगितलं आहे. भारतीय क्रिकेट टीम 2006 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्या मालिकेतील तिसऱ्या टेस्टमध्ये सचिनला जखमी करणे हा आपला उद्देश होता हे अख्तरनं कबुल केला आहे. 'मी जाणीवपूर्वक सचिनला जखमी करण्याचा प्रयत्न करत होतो. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये सचिनला त्या मॅचमध्ये जखमी करायचं होतं. स्टम्पच्या समोरून बॉल टाक असं मला इंझमान सांगत होता. पण, मला सचिनला जखमी करायचं होतं, मी त्याच्या हेल्मेटवर बॉल मारला. त्यावेळी तो जखमी झाला असं मला वाटलं. पण, व्हिडीओ पाहिल्यानंतर सचिन स्वत:ला वाचवण्यात यशस्वी झाल्याचं मला समजलं,' असं अख्तरनं सांगितलं आहे.
शोएब अख्तर यावेळी पुढे म्हणाला की, 'मी एका बाजूनं सचिनला जखमी करण्याचा प्रयत्न करत होतो. तर मोहम्मद असिफ दुसऱ्या बाजूनं त्याच्या फास्ट बॉलिंगनं भारतीय खेळाडूंना सतावत होता. असिफच्या बॉलिंगवर भारतीय बॅटर्स अडखळत होते. असिफनं त्या दिवशी ज्या पद्धतीनं बॉलिंग केली तशी मी बॉलिंग मी आजवर आयुष्यात कुणीही केलेली पाहिली नाही.'
IND vs SA : टीम इंडियाला मिळाला धोनीसारखा फिनिशर, T20 वर्ल्ड कपमध्ये ठरणार निर्णायक
भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात 2006 साली कराचीमध्ये झालेल्या टेस्टबाबत शोएब अख्तरनं हा खुलासा केला आहे. त्या टेस्टमध्ये इराफान पठाणनं पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. त्यानं सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ यांना आऊट केले होते. इरफानच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतरही भारतीय टीमचा त्या टेस्टमध्ये पराभव झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.