मुंबई, 4 जून : आयपीएल 2022 मध्ये केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीवर सर्वांचं लक्ष होतं. राहुलच्या कॅप्टनसीमध्ये नवोदीत लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला होता. त्या फेरीमध्ये त्यांचा आरसीबीनं मोठा पराभव केला. आयपीएलनंतर आगामी भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टी20 मालिकेत राहुलची मोठी परीक्षा आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीमध्ये राहुल या मालिकेत भारतीय टीमची कॅप्टनसी करणार आहे. या मालिकेत कॅप्टन म्हणून राहुलनं निराशा केली तर भविष्यात त्याला पुन्हा टीम इंडियाचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर हे 4 पर्याय कॅप्टनसीची जबाबदारी स्विकारण्यासाठी राहुलच्या मागे रांगेत उभे आहेत. राहुलला दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत स्वत:ला सिद्ध करावं लागेल. या वर्षाच्या सुरूवातीला त्यानं दक्षिण आफ्रिकेविरूद्धच वन-डे मालिकेत कॅप्टनसी केली होती. त्या मालिकेत टीम इंडियाचा 0-3 असा पराभव झाला होता. वास्तविक तेव्हा विराट कोहली राहुलच्या मदतीला टीममध्ये होता. आता त्याला एकट्यालाच लढाई लढावी लागणार आहे. गुजरात टायटन्सला IPL चॅम्पियन केल्यानंतर शुभमन गिलवर ‘या’ टीममध्ये मोठी जबाबदारी टीम इंडियाच्या निवड समितीच्या सदस्यानं ‘इनसाईड स्पोर्ट्स’ शी बोलताना सांगितले की, ‘केएल राहुलला स्वत:ला कॅप्टन म्हणून सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. त्याच्या टीममध्ये भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या हे सिनिअर खेळाडू आहेोक. त्या परिस्थितीमध्ये संभाव्य कॅप्टन म्हणून राहुलची खरी परीक्षा होणार आहे. तो या मालिकेत दबावात असेल असं मी म्हणणार नाही. पण, या मालिकेतील कॅप्टन म्हणून त्याच्या कामगिरीवर निवड समितीचं लक्ष असेल.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.