मुंबई, 7 जानेवारी : टीम इंडियाचा दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa) मोठा पराभव झाला आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी गुरूवारी यजमान दक्षिण आफ्रिकेनं 240 रनचे लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. कॅप्टन डीन एल्गारने नाबाद 96 रन काढले. याचबरोबर तीन मॅचची सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. यापूर्वी सेंच्युरियनमध्ये झालेली टेस्ट टीम इंडियानं 113 रननं जिंकली होती. या सीरिजमधील शेवटची टेस्ट 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळली जाणार आहे.
केएल राहुल (KL Rahul) दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी करत होता. विराट कोहलीनं (Virat Kohli) पाठदुखीमुळे या टेस्टमधून माघार घेतली होती. टीम इंडियानं पहिल्या टेस्ट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये जिंकली होती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये राहुल पहिल्यांदाच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॅप्टनसी करत होता. त्याने कॅप्टन म्हणून पराभवाने सुरूवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये 19 जानेवारीपासून 3 सामन्यांची वन-डे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीमध्ये राहुलची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
IPL मध्येही खराब रेकॉर्ड
केएल राहुल आयपीएल स्पर्धेचे दोन सिझन पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचा कॅप्टन होता. या काळातही त्याने बॅटर म्हणून चांगली कामगिरी केली. पण, कॅप्टन म्हणून त्याचा रेकॉर्ड निराशाजनक राहिला आहे. राहुलनं 27 आयपीएल मॅचमध्ये पंजाबची कॅप्टनसी केली. यामधील फक्त 11 सामने टीमनं जिंकले. याचाच अर्थ त्याचा विजयाचा रेकॉर्ड फक्त 41 टक्के आहे. या कालावधीत अनेकदा त्याच्यावर चोकरचा शिक्का बसला आहे. राहुलला अनेक क्रिकेट तज्ज्ञ भविष्यातील कॅप्टन समजतात. ही भूमिका पार पाडण्यासाठी त्याला कॅप्टनसीचा रेकॉर्ड सुधारावा लागेल.
टीम इंडियासाठी न्यू इयर हॅप्पी नाही, भारताच्या पराभवाची 5 कारणं
विराट-रोहितचीही पराभवानं सुरूवात
टीम इंडियाच्या कॅप्टनचा रेकॉर्ड पाहिला तर विराट कोहलीनं कॅप्टन म्हणून पराभवानं सुरूवात केली होती. जून 2013 साली श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाचा 161 रनने पराभव झाला होता. त्या मॅचमध्ये विराटनं फक्त 2 रन केले होते. दुसरिकडं महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) कॅप्टन म्हणून विजयानं सुरूवात केली होती. टीमनं टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा (India vs Pakistan) पराभव केला होता. तर, रोहित शर्मानंही कॅप्टन म्हणून पराभवानं सुरूवात केली होती. डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या लढतीमध्ये टीम इंडियाचा 7 विकेट्सनं पराभव झाला होता. त्या मॅचमध्ये रोहितनं फक्त 2 रन काढले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.