मुंबई, 22 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Indai vs South Afica) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबर रोजी सुरू होत आहे. तीन टेस्टच्या मॅचची ही सीरिज जिंकण्याची टीम इंडियाला चांगली संधी आहे, असं अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे. हेड कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली भारतीय टीम सध्या जोरदार सराव करत आहे. त्याचवेळी टीमच्या मदतीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) धावून आला आहे. सचिनने भारतीय बॅटर्सना दक्षिण आफ्रिकेत यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला आहे. सचिनने ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात सांगितलं की, ’ मी नेहमी सांगितलं आहे की फ्रंट फूट डिफेन्स खूप महत्त्वाचा आहे. पुढे येऊन बॉल डिफेन्स करणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेत हेच तंत्र सर्वात जास्त कामाला येते. पहिल्या 25 ओव्हर्समध्ये फ्रंट फुट डिफेन्स खूप निर्णायक ठरणार आहे. तुमचे हात शरिरापेक्षा जास्त दूर जाता कामा नयेत. हात दूर झाले तर कंट्रोल जातो. इंग्लंडमध्ये भारतीय बॅटर्सचे हात दूर नव्हते. अनेक बॉल त्यांच्या बॅटला लागले नाहीत. पण, काही हरकत नाही. जगातील कोणताही बॅटर सर्व बॉल खेळू शकत नाही. विकेट घेणे हेच बॉलरचे काम असते. पण, जर तुमचा हाथ शरीरापासून दूर गेला तर बॅटच्या कडेला बॉल लागू शकतो.’
3 days to the South Africa Test series and all eyes will be on Indian batting. Here is the best analyst I know @sachin_rt on a real masterclass on batting in SAF. Full show 23 Dec 2pm #BackstagewithBoria @AgeasFederal pic.twitter.com/Yg1zIn2eZs
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) December 21, 2021
सचिननं त्याच्या कारकिर्दीमध्ये 1992, 1996, 2001, 2006 आणि 2010 साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. त्याच्या नावावर पाच टेस्ट शतक आहेत. दक्षिण आफ्रिकेत 1000 पेक्षा जास्त रन करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय बॅटर आहे. त्याने 15 टेस्टमध्ये 46 पेक्षा जास्त सरासरीनं 1161 रन केले आहेत. BCCI समोर झुकलं क्रिकेट दक्षिण आफ्रिका, आपल्याच देशाचा नियम पाळणार नाही!