Home /News /sport /

BCCI समोर झुकलं क्रिकेट दक्षिण आफ्रिका, आपल्याच देशाचा नियम पाळणार नाही!

BCCI समोर झुकलं क्रिकेट दक्षिण आफ्रिका, आपल्याच देशाचा नियम पाळणार नाही!

टीम इंडिया दक्षिण आफ्रिका (India tour Of South Africa) दौऱ्यावर आहे, या दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. सीरिजचा पहिला मुकाबला 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टआधी क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) आणि बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 21 डिसेंबर : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका (India tour Of South Africa) दौऱ्यावर आहे, या दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. सीरिजचा पहिला मुकाबला 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टआधी क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) आणि बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे सीरिजमध्ये चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन मॅच बघता येणार नाही. दक्षिण आफ्रिका सरकारने मात्र कोरोना लस घेतलेल्या 2 हजार जणांना सामना बघण्याची परवानगी दिली होती. बोर्डाने मात्र सरकारच्या निर्णयाविरोधात जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. खेळाडूंची सुरक्षा आणि बायो-बबल असल्यामुळे दोन्ही बोर्डांनी हा निर्णय घेतला आहे. याआधी ऍशेस सीरिजमध्ये पॅट कमिन्स (Pat Cummins) कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला होता, त्यामुळे तो दुसऱ्या टेस्टमध्ये (Australia vs England) खेळू शकला नव्हता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सीरिजची तिकीटं विकली जाणार नाहीत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं क्रिकेट साऊथ आफ्रिकेने सांगितलं आहे. आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सापडला, यानंतरही बीसीसीआयने भारतीय टीमला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवलं. याआधी क्रिकेट साऊथ आफ्रिकाने टी-20 मंजासी सुपर लीग (MSL) कोरोनामुळे दुसऱ्यांदा रद्द केली. एमएसएलचं आयोजन फेब्रुवारी महिन्यात होणार होतं, पण ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेत प्रवास करण्यावर निर्बंध आणे, म्हणून स्पर्धा रद्द करण्यात आल्याचं बोर्डाने सांगितलं. याआधी 2020 सालीही कोरोनामुळे सत्र रद्द करण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेत मागच्या आठवड्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे कोरोनाचे रेकॉर्ड रुग्ण आढळले. ओमायक्रॉन कोरोनाच्या चौथ्या लाटेचं कारण असल्याचं मानलं जातंय. कोरोनामुळे क्रिकेट साऊथ आफ्रिकेने चार दिवसीय स्थानिक स्पर्धाही स्थगित केली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या