Home /News /sport /

IND vs SA : टेस्टनंतर वन-डेमध्येही राहुलची कॅप्टनसी फेल, सीरिज गमावल्याचं सांगितलं कारण

IND vs SA : टेस्टनंतर वन-डेमध्येही राहुलची कॅप्टनसी फेल, सीरिज गमावल्याचं सांगितलं कारण

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India vs South Africa) निराशाजनक ठरत आहे. भारतीय टीमनं पहिली टेस्ट जिंकल्यानंतर मालिका 1-2 या फरकाने गमावली. त्यानंतर वन-डे मालिका देखील यजमान टीमनं जिंकली आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India vs South Africa) निराशाजनक ठरत आहे. भारतीय टीमनं पहिली टेस्ट जिंकल्यानंतर मालिका 1-2 या फरकाने गमावली. त्यानंतर वन-डे मालिका देखील यजमान टीमनं जिंकली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत आफ्रिकेनं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात आफ्रिकेनं 7 विकेट्सनं पराभव केला. वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे ही मालिका खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) या मालिकेत टीम इंडियाचा कॅप्टन आहे. राहुल कॅप्टन म्हणून या दौऱ्यात फेल गेला आहे. या दौऱ्यात त्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळलेले सर्व सामने भारतीय टीमनं गमावले आहेत. राहुलनं सांगितलं कारण वन-डे मालिका गमावल्यानंतर राहुलनं या पराभवाचं कारण सांगितलं. 'माझ्या मते यजमान टीमनं त्यांच्या होम ग्राऊंडवर चांगला खेळ केला. आम्ही काही चुका केल्या, हा आमच्यासाठी एक चांगला धडा आहे. मिडल ऑर्डरमधील भागिदारी निर्णायक असते. त्याचबरोबर आम्हाला चांगली बॉलिंग देखील करावी लागेल या पिचवर 280 रनचा पाठलाग सहज होईल, असे मला वाटत नव्हते. पण, आफ्रिकेच्या टीमला याचे श्रेय द्यायला हवे. पहिल्या वन-डेमध्ये शिखर आणि विराटनं खूप चांगल्या पद्धतीनं बॅटींग केली. आम्ही शेवटचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. ' असे स्पष्टीकरण राहुलने दिले आहे. सौरव गांगुली विराटला नोटीस पाठवणार होता! अखेर दादाने सोडलं 'त्या' विषयावर मौन भारताने दिलेलं 288 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 48.1 ओव्हरमध्ये पार केलं. जानेमन मलानने सर्वाधिक 91 रनची खेळी केली, तर क्विंटन डिकॉकने 78 रन केले. एडन मार्करम आणि रस्सी व्हॅन डर डुसेन प्रत्येकी 37 रनवर नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने 35 रन केले. भारताकडून बुमराह, चहल आणि ठाकूर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 287 रन केले. केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची अर्धशतकं आणि शार्दुल ठाकूर-आर.अश्विन यांच्यात झालेल्या नाबाद 48 रनच्या पार्टनरशीपमुळे भारताला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. ठाकूरने 38 बॉलमध्ये नाबाद 40 तर अश्विनने 24 बॉलमध्ये 25 रनची नाबाद खेळी केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Kl rahul, South africa, Team india

    पुढील बातम्या