Home /News /sport /

सौरव गांगुली विराटला नोटीस पाठवणार होता! अखेर दादाने सोडलं 'त्या' विषयावर मौन

सौरव गांगुली विराटला नोटीस पाठवणार होता! अखेर दादाने सोडलं 'त्या' विषयावर मौन

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत.

    मुंबई, 22 जानेवारी : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत. विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर दोघांमधील मतभेद सर्वात प्रथम समोर आले. या पत्रकार परिषदेनंतर संतपालेल्या गांगुली यांनी विराटला नोटीस पाठवणार असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. सौरव गांगुली यांनी विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचे वृत्त चूकीचे आहे. या विषयावरील वृत्त हे खोटे असल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. गांगुलीने न्यूज एजन्सी ANI शी बोलताना हे स्पष्टीकरण दिले आहे. काय आहे प्रकरण? विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली होती. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी न सोडण्याचा सल्ला दिला होता, पण तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, असं गांगुलीने सांगितलं. गांगुलीचा हा दावा विराट कोहलीने मात्र फेटाळून लावला. मला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची निवड करण्याच्या काही मिनिटं आधी निवड समितीने तुला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे, असं सांगितल्याचं विराट म्हणाला. IPL 2022: 10 टीमनं केले 33 खेळाडू रिटेन, वाचा कुणाला मिळणार किती रक्कम! विराट कोहलीने खोटं ठरवल्यानंतर सौरव गांगुली मात्र चांगलाच भडकला असल्याचं वृत्त इंडिया अहेड न्यूजने दिलं आहे. संपातलेल्या सौरव गांगुलीने विराट कोहलीला नोटिस पाठवण्याची तयारीही केली होती,  असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला होता. गांगुली यांनी हा दावा फेटाळला आहे. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाला, यानंतर दुसऱ्याच दिवशी विराटने टेस्ट टीमची कॅप्टन्सीही सोडली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Sourav ganguly, Virat kohli

    पुढील बातम्या