मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : IPL चे हिरो सलग दुसऱ्यांदा फेल, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा

IND vs SA : IPL चे हिरो सलग दुसऱ्यांदा फेल, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा

भारतीय टीमसाठी काळजीची बाब म्हणजे आयपीएल 2022 मध्ये आपल्या टीमसाठी हिरो ठरणारे भारतीय खेळाडू या मालिकेत (IND vs SA) झिरो ठरत आहेत.

भारतीय टीमसाठी काळजीची बाब म्हणजे आयपीएल 2022 मध्ये आपल्या टीमसाठी हिरो ठरणारे भारतीय खेळाडू या मालिकेत (IND vs SA) झिरो ठरत आहेत.

भारतीय टीमसाठी काळजीची बाब म्हणजे आयपीएल 2022 मध्ये आपल्या टीमसाठी हिरो ठरणारे भारतीय खेळाडू या मालिकेत (IND vs SA) झिरो ठरत आहेत.

मुंबई, 13 जून : दक्षिण आफ्रिका विरूद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेत टीम इंडिया 0-2 ने पिछाडीवर पडली आहे. कटकमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय बॉलर्स आणि बॅटर्स दोघंही फेल  गेले. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतीय टीमचा या वर्षातील हा सातवा पराभव आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियानं 2 टेस्ट आणि 3 वनम-डे गमावल्या होत्या. कटकमधील पराभवानंतर ही टी20 मालिका देखील गमावण्याचा धोका टीम इंडियासमोर आहे.

भारतीय टीमसाठी काळजीची बाब म्हणजे आयपीएल 2022 मध्ये आपल्या टीमसाठी हिरो ठरणारे भारतीय खेळाडू या मालिकेत झिरो ठरत आहेत. आयपीएल स्पर्धेप्रमाणे खेळ करण्यात त्यांना अपयश येतंय. त्याचाच परिणाम या दोन सलग पराभवात झाला आहे.

IPL चे हिरो फेल

आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा युझवेंद्र चहल, गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणारा हार्दिक पांड्या, हर्षल पटेल आणि केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर पहिल्या दोन सामन्यात मॅच विनिंग कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक 27 विकेट्स घेणाऱ्या चहलला पहिल्या दोन सामन्यात मिळून फक्त 1 विकेट मिळाली आहे. त्यासाठी त्यानं 6 ओव्हर्समध्ये तब्बल 75 रन मोजले आहेत. दुसरा स्पिनर अक्षर पटेलनं रविवारी पहिल्याच ओव्हरमध्ये 19 रन दिल्यानंतर पंतनं त्याला बॉलिंग दिलीच नाही. अक्षरनं 2 सामन्यात 5 ओव्हर्स बॉलिंग करून 59 रन दिले असून त्याला एकच विकेट मिळाली आहे.

आरसीबीचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेल टीम इंडियाकडून तशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. हर्षलनं पहिल्या टी 20 मध्ये 4 ओव्हर्समध्ये 42 रन दिले आणि 1 विकेट घेतली. तर दुसऱ्या टी20 मध्ये 3 ओव्हर्समध्ये 17 रन देऊन एक विकेट घेतली.  श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या हे आयपीएल टीमचे कॅप्टनही भारतीय टीमला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत.

क्रिकेटच्या मैदानात भाऊ बनला वैरी! बाऊन्सरनं केलं जखमी, सोडावं लागलं मैदान

 हार्दिकनं पहिल्या टी20 सामन्यात 12 बॉलमध्ये 31 रन करत टीम इंडियाला 200 च्या पुढे पोहचवले. पण, तो बॉलिंगमध्ये महागडा ठरला. त्याच्या एकाच ओव्हरमध्ये 18 रन गेले. तर दुसऱ्या टी20 मध्ये हार्दिक बॅट आणि बॉल दोन्हीमध्येही अपयशी ठरला. तो फक्त 9 रन काढून आऊट झाला तर त्यानं 3 ओव्हरमध्ये 31 रन देत एक विकेट मिळवली.

श्रेयस अय्यरची अवस्थाही वेगळी नाही. त्यानं दोन्ही सामन्यात रन केले, पण त्याचा स्ट्राईक रेट कमी होता. तसंच तो टीम इंडियाला गरज असताना आऊट झाला. सेट झालेला श्रेयस वेळेवर आऊट झाल्याचा परिणामही टीम इंडियाच्या बॅटींगवर झाला.

First published:

Tags: Cricket news, Ipl 2022, South africa, Team india