मुंबई, 13 जून : क्रिकेट टीममधील भावांच्या जोड्या हे प्रसिद्ध आहेत. मार्क वॉ - स्टीव्ह वॉ पासून हार्दिक पांड्या - कृणाल पांड्या या जोडीपर्यंत या भावांनी एकत्र खेळत मैदान गाजवलं आहे. टी20 क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अनेकदा भाऊ-भाऊ एकमेकांच्या विरोधी टीममध्ये खेळतात. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनमध्ये (IPL 2022) हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कॅप्टन होता.तर कृणाल पांड्या हा लखनऊ सुपर जायंट्सचा सदस्य होता. त्यामुळे गुजरात विरूद्ध लखनऊ मॅचमध्ये हे भाऊ एकमेकांच्या समोर आले होते.
इंग्लिश क्रिकेट कौंटीमध्येही सध्या दोन भाऊ एकमेकांच्या विरूद्ध खेळत आहे. समरसेट विरूद्ध सरे यांच्यात सामना सुरू आहे. या मॅचमध्ये क्रेग ओव्हरटन समरसेटकडून तर जॅमी ओव्हरटन सरेकडून खेळत आहे. मॅचच्या दरम्यान क्रेग बॅटींगसाठी उतरला तेव्हा जॅमीला समोर आपला भाऊ आहे, याचा विसर पडला. जॅमीच्या भेदक बॉलिंगपुढे समरसेटची टीम 180 रनवरच ऑल आऊट झाली.
Jamie Overton is bowling with serious pace 🔥
He welcomes brother Craig back with a sharp bouncer after retiring hurt! Watch their #LVCountyChamp battle live: https://t.co/lBNsyS6zOQ pic.twitter.com/rgf6CkPCkZ — LV= Insurance County Championship (@CountyChamp) June 12, 2022
जॅमीनं या इनिंगमध्ये त्याच्या भावालाही सोडलं नाही. त्यानं भावाचं स्वागतही बाऊन्सर टाकून केलं. क्रेगनं पहिला बाऊन्सर डक करून खेळून काढला. त्यावेळी त्यानं खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर क्रेग 20 रनवर असताना जॅमीनं त्याच्या हेल्मेटवर बॉल मारला. जॅमीचा हा बाऊन्सर इतका जोरात होता की क्रेगला रिटायर हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. ड्रेसिंग रूममध्ये उपचार घेऊन क्रेग मैदानात परतला. त्यानंतर तो आणखी 9 रनच करू शकला. तो 29 रन काढून आऊट झाला.
IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवातही भुवनेश्वर चमकला, 10 वर्षांनी केली रेकॉर्डची बरोबरी
दरम्यान, आपला भावाला जखमी करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, अशी प्रतिक्रिया जॅमीनं दिली. एप्रिल महिन्यानंतर पहिल्यांदाच ओव्हरटन बंधू एकमेकांच्या विरूद्ध खेळत होते. या मॅचमध्ये जॅमीनं जोश डवे या समरसेटच्या आणखी एका खेळाडूला रिटायर हर्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England