मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : 29 वर्षात झाले नाही ते आज होणार? टीम इंडिया आणि राहुलला इतिहास घडवण्याची संधी

IND vs SA : 29 वर्षात झाले नाही ते आज होणार? टीम इंडिया आणि राहुलला इतिहास घडवण्याची संधी

टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गेल्या 29 वर्षांमध्ये कधीही जमलं नाही, ते सेंच्युरियन टेस्टच्या (India vs South Africa) दुसऱ्या दिवशी करण्याची संधी आहे

टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गेल्या 29 वर्षांमध्ये कधीही जमलं नाही, ते सेंच्युरियन टेस्टच्या (India vs South Africa) दुसऱ्या दिवशी करण्याची संधी आहे

टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गेल्या 29 वर्षांमध्ये कधीही जमलं नाही, ते सेंच्युरियन टेस्टच्या (India vs South Africa) दुसऱ्या दिवशी करण्याची संधी आहे

मुंबई, 27 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टवर टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं. केएल राहुलच्या (KL Rahul) नाबाद 122 रनच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 3 आऊट 272 रन केले होते. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीमध्ये ओपनिंगला आलेल्या मयंक अग्रवालनं (Mayank Agarwal) 60 रनची खेळी केली. तर खराब फॉर्ममुळे टीका होत असलेला अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर नाबाद आहे.

टीम इंडियाला ऐतिहासिक संधी

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गेल्या 29 वर्षांमध्ये कधीही जमलं नाही, ते सेंच्युरियन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी करण्याची संधी आहे. केएल राहुलला आज (सोमवार) इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेत आजवर कोणत्याही भारतीय बॅटरला द्विशतक झळकावता आलेलं नाही. सचिन तेंडुलकरनं 1997 साली केपटाऊन टेस्टमध्ये काढलेले 169 रन ही भारतीय बॅटरची आफ्रिकेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं यापूर्वी आफ्रिकेत 150 रनचा टप्पा ओलांडला आहे. त्या दोघांनीही 153 रनची खेळी केली आहे.

टीम इंडियानं यापूर्वी सातवेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. यामध्ये फक्त 4 इनिंगमध्ये भारतीय टीमनं 400 पेक्षा जास्त रन काढले आहेत. टीम इंडियाचा 459 हा सर्वोच्च स्कोअर असून 2011-12 च्या दौऱ्यात सेंच्युरियनमध्येच भारतीय टीमनं हे रन केले होते. त्या टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरनं नाबाद 111 तर महेंद्रसिंह धोनीनं 90 रन काढले होते. त्यानंतर 2013 साली जोहान्सबर्गमध्ये भारतीय टीमनं 421 रन केले होते. त्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं पहिल्या इनिंगमध्ये 119 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 96 रन काढले.

मुंबईकर सूर्याचं मोठं मन, 249 रन केल्यानंतरची कृती वाचून वाटेल अभिमान!

टीम इंडिया दुसऱ्या दिवशी मैदानात उतरेल त्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच 500 रनचा टप्पा ओलांडण्याचे टीमचे ध्येय असेल. त्याचबरोबर खराब फॉर्ममधील अजिंक्य रहाणे देखील मोठ्या खेळीच्या निर्धारानं मैदानात उतरणार आहे. रहाणे मागील वर्षी मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

First published:

Tags: Cricket news, Kl rahul, South africa, Team india