मुंबई, 27 डिसेंबर : मुंबईकर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यावर्षी चांगलाच चर्चेत आहे. टीम इंडियाकडून खेळण्याची त्याची प्रतीक्षा 2021 मध्ये पूर्ण झालाी. वन-डे आणि टी20 या दोन्ही प्रकारात सूर्यानं चांगली कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या खेळामुळे इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात त्याची निवड झाली होती.
सूर्यकुमार यादवनं मुंबईत सुरू असलेल्या 74 व्या पोलीस शिल्ड स्पर्धेत (Police Shield) आक्रमक द्विशतक झळकावले. तीन दिवसाच्या या सामन्यात त्याने पारसी जिमखानाकडून (Parsee Gymkhana) खेळताना स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पहिल्याच दिवशी ही कामगिरी केली. सूर्यानं 152 बॉलमध्ये 249 रन काढले. या खेळीत त्याने 37 फोर आणि 5 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्याने फक्त 42 बॉलमध्ये 178 रन काढले.
या जबरदस्त खेळीमुळे सूर्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर सूर्यानं मनाचा मोठेपणा दाखवत त्याला मिळालेली पुरस्काराची सर्व रक्कम मैदानातील देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (Groundmen) दिली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' नं हे वृत्त दिलं आहे.
सूर्यकुमारनं 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'माझ्या मते ग्राऊंडमनकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. त्यांना त्यांच्या कामाचे श्रेय मिळायला हवं. खेळाच्या आयोजनात त्यांचे योगदान मोठे असते. फॅन्स खेळाडूंवर प्रेम करतात, त्यांना आदर देतात. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये खेळाडूंचं नावही येतं. पण ग्राऊंडमनबद्दल कुणीही बोलत नाही.
IND vs SA: राहुल द्रविडच्या प्लॅनिंगचा टीम इंडियाला फायदा, पहिल्या दिवसानंतर झाला खुलासा
सर्व खेळाडूंनी ग्राऊंडमनबाबत विचार केला पाहिजे. मॅचमधील त्यांचं महत्त्व समजलं पाहिजे. ते आमच्यासाठी पिच तयार करतात. या पिचवर खेळाडूंची कारकिर्द फुलते, त्यांच्या कष्टामुळेच हे शक्य होते. या योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा झाली पाहिजे. असे सूर्याने स्पष्ट केले. '
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Mumbai, Suryakumar yadav