मुंबई, 9 जून : आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया पहिली आंतरराष्ट्रीय मालिका दक्षिण आफ्रिका विरूद्ध खेळणार आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिला टी20 सामना आता काही तासांमध्ये दिल्लीत सुरू होईल. या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. या मालिकेतील भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून आऊट झाला आहे. राहुलच्या जागी ऋषभ पंतची (Rishabh Pant) कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केएल राहुल मालिकेतून आऊट झाल्यानं टीम इंडियाच्या प्लेईंग 11 चं समीकरणही बदललं आहे. राहुल भारतीय टीमचा भरवशाचा ओपनर आहे. नियमित कॅप्टन आणि ओपनर रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आल्यानं राहुलवर ओपनिंगचीही अतिरिक्त जबाबदारी होती. आता राहुलच्या जागी ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी मिळणार आहे. टीम इंडियातील पुणेकरानं मागील वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सर्वाधिक रन करत ऑरेंज कॅप पटकावली होती. ऋतुराजनं आत्तापर्यंत 3 टी20 इंटरनॅशनल खेळल्या असून त्यामध्ये 13 च्या सरासरीनं रन केले आहेत. त्याला आत्तापर्यंत फारशी संधी मिळालेली नाही. आता राहुलच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्यांदाच त्याला संपूर्ण मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन ही तरूण जोडी या मालिकेत भारतीय इनिंगची ओपनिंग करेल. IND vs SA : दिल्लीतील मॅचपूर्वी मोठा बदल, BCCI नं अचानक बदलला नियम भारताची संभाव्य टीम : इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.