जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : दिल्लीतील मॅचपूर्वी मोठा बदल, BCCI नं अचानक बदलला नियम

IND vs SA : दिल्लीतील मॅचपूर्वी मोठा बदल, BCCI नं अचानक बदलला नियम

IND vs SA : दिल्लीतील मॅचपूर्वी मोठा बदल, BCCI नं अचानक बदलला नियम

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दिल्लीमध्ये होणाऱ्या मॅचसाठी बीसीसीआयनं एक मोठा नियम बदलला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जून : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (गुरूवार) दिल्लीमध्ये होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. राजधानीमध्ये सातत्यानं 40 अंशापेक्षा जास्त तापमान आहे. काही भागात तर 45 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांच्या तयारीवरही पडला आहे. दोन्ही टीमनं संध्याकाळीच प्रॅक्टीस केली. दिल्लीतील वाढते तापमान लक्षात घेता बीसीसीआयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील टी20 सामन्याच्या दरम्यान प्रत्येक 10 ओव्हर्सनंतर ड्रिंक ब्रेक असेल. खेळाडूंच्या शरिरातील पाणी कमी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआच्या अधिकाऱ्यानं ‘इनसाईड स्पोर्ट्स’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन्ही टीमनं ड्रिंक्स ब्रेक्सची मागणी केली होती. बीसीसीआयकडून देखील त्याला मान्यता मिळू शकते.’ अर्थात ड्रिंक्स ब्रेक्सच्या नियमांमधील बदल हा फक्त पहिल्या टी20 सामन्यासाठी आहे की  या मालिकेतील पाचही सामन्यांसाठी आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. साधारणपणे टी20 इंटरनॅशनलमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स नसतात. पण, यूएईमध्ये मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या दरम्यान आयसीसीनं ही सुरूवात केली. तेव्हा देखील उष्णतेमुळे हा निर्णय घेतला होता. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यानही टाईम आऊटमुळे खेळाडूंना दिलासा मिळतो. IND vs SA : राहुलला बसणार मोठा धक्का, टीम मॅनेजमेंट करणार वेगळा विचार यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बाऊमा (Temba Bavuma) यानं दिल्लीतील वातावरणाबद्दल काळजी व्यक्त केली होती. ’ दिल्लीमध्ये हवा उष्ण असेल याची आम्हाला जाणीव होती. पण इतका उकाडा असेल असं वाटलं नाही. सुदैवानं संध्याकाळी हा सामना होणार आहे. सूर्य मावळल्यानंतर उकाडा सहन केला जाऊ शकतो. आमच्यासाठी हा उकाडा हे सर्वात मोठे आव्हान आहे, आम्हाला याची सवय नाही.’ असे त्याने सांगितले होते. तर, या गोष्टी खेळाचा भाग आहेत. याबाबत फार विचार न करता मॅचवर फोकस करणार असल्याचं टीम इंडियाचा कॅप्टन ऋषभ पंतनं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात