जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: चहलला पाहताच गडबडला गप्टील, यापूर्वी Live मध्ये दिली होती शिवी

IND vs NZ: चहलला पाहताच गडबडला गप्टील, यापूर्वी Live मध्ये दिली होती शिवी

IND vs NZ: चहलला पाहताच गडबडला गप्टील, यापूर्वी Live मध्ये दिली होती शिवी

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टी20 मॅच शुक्रवारी रांचीमध्ये झाली. या मॅचपूर्वी युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal)न्यूझीलंडचा बॅटर मार्टीन गप्टील (Martin Guptill) सोबतच्या चर्चेचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, 20 नोव्हेंबर: टीम इंडियाचा बॉलर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पहिल्या दोन मॅचमध्ये खेळला नाही.त्यानंतरही तो फॅन्सचं मनोरंजन करत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टी20 मॅच शुक्रवारी रांचीमध्ये झाली. या मॅचपूर्वी चहलनं न्यूझीलंडचा बॅटर मार्टीन गप्टील (Martin Guptill) सोबतच्या चर्चेचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. चहलनं यावेळी गप्टीलला मागच्या वर्षी व्हायरल झालेल्या एका घटनेवरुन चिडवलं. तू मला मागच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये काय म्हणाला होतास असा प्रश्न चहलनं गप्टीलला विचारला. हा प्रश्न ऐकताच गप्टील गडबडला. ‘मित्रा कसा आहेस असं मी विचारलं होतं.’ असं सांगत सारवाारव करण्याचा प्रयत्न गप्टीलनं यावेळी केला. त्यानंतर मला त्या घटनेबद्दल नीट आठवत नाही, असं सांगत चहलनं वेळ मारून नेली.

जाहिरात

चहलनं उल्लेख केलेली घटना टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात चांगलीच गाजली होती. त्यावेळी टी20 मॅच संपल्यानंतर चहल रोहित शर्माची (Rohit Sharma) मुलाखत घेत होता. त्यावेळी गप्टील तिथं आला आणि त्यानं चहलला हिंदीमधून शिवी दिली. चहल लाईव्ह करत आहे. याची कसलीही माहिती गप्टीलला नव्हती. ते समजल्यानंतर गप्टीलचा चेहरा अचानक बदलला. हा सर्व प्रकार पाहून रोहितलाही हसू आवरलं नव्हतं. T10 Cricket: ख्रिस गेलचा धमाका, Tweet करत आधीच दिला होता इशारा चहलचा नवा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय झाला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत चहलला अद्याप प्लेईंग11 मध्ये संधी मिळालेली नाही. अनुभवी आर. अश्विन आणि ऑल राऊंडर अक्षर पटेल हे दोन स्पिनर टीम इंडियानं या मालिकेत खेळवले आहेत. तर मार्टीन गप्टीलनं पहिल्या टी20 मध्ये न्यूझीलंडकडून 70 रनची खेळी केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात जास्त रन करणारा बॅटर बनला आहे. त्यानं यावेळी विराट कोहलीला मागे टाकलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात