मुंबई, 20 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप संपताच टी10 या क्रिकेटमधील सर्वात छोट्या प्रकारातील स्पर्धा यूएईमध्ये सुरू झाली आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या स्पर्धेतून दुसऱ्या मॅचमध्ये टीम अबू धाबीची लढत बांगला टायगरशी (Team Abu Dhabi vs Bangla Tigers) होती. या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष युनिवर्स बॉस ख्रिस गेलकडं (Chris Gayle) होतं. टी20 वर्ल्ड कपमध्ये गेलला कमाल करता आली नव्हती. गेलची निराशाजनक खेळी हे देखील वेस्ट इंडिजची टीम स्पर्धेतून लवकर आऊट होण्याचं एक कारण होतं. या वर्ल्ड कपनंतर गेल निवृत्त होणार अशी चर्चा होती. गेलला देखील याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्या सर्वांवर गेलनं मॅचपूर्वी एक छोटसं ट्विट करत उत्तर दिलं होतं. ‘मी कुठंही जाणार नाही.’ असं ट्विट गेलनं करत निवृत्तीची शक्यता फेटाळली होती. त्यानंतर शुक्रवारच्या मॅचमध्ये गेलनं तेच केलं, ज्यासाठी तो ओळखला जातो.
I Ain’t Leaving…
— Chris Gayle (@henrygayle) November 18, 2021
गेल या मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आला होता. त्यानं मैदानात येताच जोरदार फटकेबाजी सुरू केली. गेलनं 23 बॉलमध्ये नाबाद 49 रन काढले. यामध्ये 5 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. गेलला आयर्लंडचा बॅटर पॉल स्टर्लिंगनं चांगली साथ दिली. त्यानं 23 बॉलमध्ये 59 रन काढले. स्टर्लिंगनं या खेळीत 6 फोर आणि 5 सिक्स लगावले. गेल आणि स्टर्लिंगच्या खेळीमुळे टीम अबू धाबीनं निर्धारित 10 ओव्हर्समध्ये 4 आऊट 145 रन काढले. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली करणार तिसऱ्या मॅचची ओपनिंग, 2 वर्षांनी कोलकातामध्ये होणार मॅच बंगाल टायगरला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांचा कॅप्टन फाफ ड्यू प्लेसिस (Faf Du Plessis) शून्यावर आऊट झाला. त्यांची संपूर्ण टीम 10 ओव्हर्समध्ये 8 आऊट 105 रन करू शकली.