कोलकाता, 22 नोव्हेंबर: टीम इंडियानं टी20 मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकत टी20 वर्ल्ड कपमधील आठवणी (T20 World Cup 2021) की विसरल्या आहेत. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 मध्ये भारतीय टीमनं न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 73 रननं दणदणीत पराभव केला. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करत 184 रन काढले. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडची टीम 111 रनवर आटोपली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची अनुक्रमे पूर्णवेळ कॅप्टन आणि पूर्णवेळ कोच म्हणून ही पहिलीच सीरिज होती. या सीरिजमध्ये टीम इंडियात झालेल्या 5 मोठ्या बदलामुळे हा विजय शक्य झाला. काय आहेत हे बदल पाहूया...
पहिला बदल: टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वन-डेमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाली. टी20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या दोन मॅचमध्ये हे करण्यात अपयश आले होते. त्यामुळे बॉलर्स दबावात होते.
दुसरा बदल: टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन मॅचमध्ये भारतीय ओपनर्स अपयशी ठरले. त्याचा फटका टीमला बसला. सेमी फायनल गाठण्यात अपयश आले, या मालिकेतील सर्व सामन्यात ओपनर्सनी दमदार खेळ केला. पहिल्या दोन मॅचमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल तर शेवटच्या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीनं चांगली सुरूवात केली. रोहित तर 'मॅन ऑफ द सीरिज' ठरला.
That's that from the Eden Gardens as #TeamIndia win by 73 runs and clinch the series 3-0.
Scorecard - https://t.co/MTGHRx2llF #INDvNZ @Paytm pic.twitter.com/TwN622SPAz — BCCI (@BCCI) November 21, 2021
तिसरा बदल: टी20 क्रिकेटमधील डे-नाईट मॅचमध्ये टॉस हा मोठा घटक असतो. विराट कोहली (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन मॅचमध्ये टॉस हरल्यानं दबावात आला. रोहित शर्मा याबाबतीत लकी ठरला. त्यानं तीन्ही मॅचमध्ये टॉस जिंकला. त्यापैकी पहिल्या दोन मॅचमध्ये पहिल्यांदा बॉलिंग केली. त्यानंतर मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करत विजय मिळवला.
चौथा बदल: या मालिकेत व्यंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल या नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आली. दोघांनीही स्वत:ला सिद्ध केले. अय्यरनं शेवटच्या मॅचमध्ये 20 रन काढले आणि एक विकेट घेतली. तर हर्षल पटेलनं दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाचा सगळ्यात मोठा विजय, पण काही मिनिटांमध्येच द्रविडने खेळाडूंना आणलं जमिनीवर!
पाचवा बदल: रोहित शर्माची पूर्णवेळ कॅप्टन म्हणून ही पहिलीच मालिका होती. कॅप्टनसीच्या जबाबदारीमुळे त्यानं बॅटींगमध्ये कोणताही बदल केला नाही. रोहितनं पहिल्या मॅचमध्ये 48 रन काढले. त्यानंतरच्या दोन्ही मॅचमध्ये अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर त्यानं मॅच दरम्यान चांगले निर्णय घेत सर्वांना प्रभावित केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rahul dravid, Rohit sharma, Team india