मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: हर्षल आणि दीपकनं दूर केली रोहितची डोकेदुखी, टीम इंडिया झाली आणखी भक्कम

IND vs NZ: हर्षल आणि दीपकनं दूर केली रोहितची डोकेदुखी, टीम इंडिया झाली आणखी भक्कम

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धची (India vs New Zealand) टी20 मालिका 3-0 नं जिंकली आहे. कोलकातामधील शेवटच्या सामन्यात रोहितची एक मोठी डोकेदुखी दूर झाली आहे.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धची (India vs New Zealand) टी20 मालिका 3-0 नं जिंकली आहे. कोलकातामधील शेवटच्या सामन्यात रोहितची एक मोठी डोकेदुखी दूर झाली आहे.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धची (India vs New Zealand) टी20 मालिका 3-0 नं जिंकली आहे. कोलकातामधील शेवटच्या सामन्यात रोहितची एक मोठी डोकेदुखी दूर झाली आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धची (India vs New Zealand) टी20 मालिका 3-0 नं जिंकली आहे. तिसऱ्या मॅचमध्ये रोहितनं वेगवान अर्धशतक झळकावत टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिली होती. त्यानंतर मिडल ऑर्डर अचानक गडगडली. त्या परिस्थितीमध्ये लोअर ऑर्डरच्या खेळाडूंनी उपयुक्त कामगिरी करत शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 50 रन काढले. त्यामुळे रोहितची मोठी डोकेदुखी दूर झाली आहे.

रोहितनं मॅचनंतर सांगितलं की, 'आम्ही मिडल ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करू शकतो. पण लोअर ऑर्डरच्या बॅटर्सनी जो खेळ केला त्यामुळे मी समाधानी आहे. तुम्ही जगभारातील टीम पाहिल्या तर त्यांच्याकडं लोअर ऑर्डरमध्ये चांगले बॅटर्स आहेत. आठव्या आणि नवव्या क्रमांकावरचे बॅटर्स महत्तवाची भूमिका बजावू शकतात. हर्षल पटेल (Harshal Patel) हरयणाकडून ओपनिंग करतो. दीपक चहरनं (Deepak Chahar) श्रीलंकेविरुद्ध चांगली बॅटींग केली होती.'

रोहित शर्मानं या सीरिजमध्ये 159 रन काढले. त्यामुळे त्याला 'मॅन ऑफ द सीरिज' चा पुरस्कार देण्यात आाला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतल्यावर चांगली सुरूवात करणे आवश्यक होते, असे रोहितने सांगितले. 'मी बॅटींग करताना चांगली सुरूवात करण्यावर माझा भर असतो. एकदा पिच आणि परिस्थिती समजली की एक बॅटर म्हणून काय करण्याची गरज आहे, हे तुम्हाला माहिती होतं.' असं रोहितनं सांगितलं.

या सामन्यात रोहितनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. या दिवसांमध्ये भारतात रात्रीच्या वेळी धुकं पडतं, त्यामुळे बॉल ओला होतो आणि बॉलर्ससाठी बॉल ग्रिप करणं कठीण असतं, त्यामुळे बहुतेकवेळा कर्णधार टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतात. रोहितनेही पहिल्या दोन्ही सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगच घेतली होती, पण सीरिजचा निर्णय आधीच भारताच्या बाजूने लागल्यामुळे तसंच बॉलर्सना या वातावरणात बॉलिंगचा सराव व्हावा म्हणून रोहितने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

IND vs NZ: रोहित-द्रविडच्या पहिल्या सीरिजमध्ये टीम इंडियात झाले 5 बदल, वाचा सविस्तर

भारताने दिलेल्या 185 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 111 रनवर ऑल आऊट झाला. अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 9 रन देत 3 विकेट घेतल्या. तर हर्षल पटेलला 2 आणि दीपक चहर, युझवेंद्र चहल, व्यंकटेश अय्यरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टीलने 36 बॉलमध्ये 51 रन केले. गप्टीलशिवाय दुसऱ्या कोणत्याही न्यूझीलंडच्या बॅटरला मोठा स्कोअर करता आला नाही

First published:
top videos

    Tags: Cricket news, Rohit sharma, Team india