जयपूर, 17 नोव्हेंबर: आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) केलेल्या दमदार कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा ओपनर व्यंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) टीम इंडियात निवड झाली आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) लगेच होणाऱ्या या भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand T20 Series) टी20 सीरिजसाठी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला असून व्यंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड, आवेश खान आणि हर्षल पटेल यांचा पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. व्यंकटेश अय्यरचा एक व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. त्यामध्ये अय्यरनं टीममधील निवडीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला टीममध्ये निवड झाल्याची बातमी आवेश खाननं (Avesh Khan) दिली. तो माझ्या खोलीत आला आणि त्यानं आपल्या दोघांची टीममध्ये निवड झाल्याचं सांगितलं. मला माझ्या निवडीपेक्षा त्याच्या निवडीवर अधिक आनंद झाला. त्यानंतर मी ही बातमी आई-वडील, आणि बहिणीला फोन करून सांगितली. आम्ही बराच काळ देशांतर्गत क्रिकेट एकत्र खेळलं आहे. आम्ही जवळपास पाच वर्ष रूममेट्स होतो. तसंच एकमेकांना चांगलं ओळखतो.’ असं त्यानं सांगितलं.
Of bond with buddy @Avesh_6 👌
— BCCI (@BCCI) November 17, 2021
Warm welcome from @ImRo45, Rahul Dravid & @RishabhPant17 👏
Special request for WWE's The Undertaker 😎
@ivenkyiyer2512 discusses it all with @28anand in this special feature. 👍 #TeamIndia #INDvNZ
Full interview 🎥 🔽 https://t.co/xPiTo2h1NL pic.twitter.com/hFbxv23wy7
26 वर्षांचा व्यंकटेश अय्यर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्याच आयपीएल स्पर्धेत त्यानं 128 च्या स्ट्राईक रेटनं 370 रन काढले होते. तसंच तो उपयुक्त बॉलरही आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे फारशी बॉलिंग करत नाही. त्यामुळे त्याचा पर्याय म्हणून अय्यरकडं पाहिलं जात आहे. BCCI ला मोठा दिलासा, ICC च्या निर्णयामुळे होणार 1500 कोटींची बचत आयपीएल 2021 मध्ये हर्षल पटेलच्या 32 विकेटनंतर आवेश खान सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा बॉलर आहे. ‘आवेश 142-145 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉलिंग करतो. सपाट खेळपट्टीवर त्याच्या बॉलला चांगला बाऊन्स मिळतो. त्याच्याकडूनही टीम मॅनेजमेंटला मोठी आशा आहे. जयपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टी20 मध्ये व्यंकटेश आणि आवेश या दोघांनाही प्लईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.