मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BCCI ला मोठा दिलासा, ICC च्या निर्णयामुळे होणार 1500 कोटींची बचत

BCCI ला मोठा दिलासा, ICC च्या निर्णयामुळे होणार 1500 कोटींची बचत

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) 2024 ते 2031 या कालावधीत होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांची घोषणा केली आहे. यापैकी 3 स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळालं आहे.

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) 2024 ते 2031 या कालावधीत होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांची घोषणा केली आहे. यापैकी 3 स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळालं आहे.

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) 2024 ते 2031 या कालावधीत होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांची घोषणा केली आहे. यापैकी 3 स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळालं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 नोव्हेंबर:  इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) 2024 ते 2031 या कालावधीत होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांची घोषणा केली आहे. यापैकी 3 स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळालं आहे. भारतामध्ये 2026 साली टी20 वर्ल्ड कप, 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 साली वन-डे वर्ल्ड कप होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांसाठी बीसीसीआयला दिलासा मिळाला आहे.

या सर्व स्पर्धांसाठी आयसीसी भारत सरकारला 10 टक्के टॅक्स देण्यास तयार झालं आहे. त्यामुळे बीसीसीआयचे 1500 कोटी वाचणार आहेत. यापूर्वी 2016 साली झालेला टी20 वर्ल्ड कप आणि 2023 साली होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपच्या आयोजनात  बीसीसीआयचं 750 कोटींचं नुकसान होणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'मधील वृत्तानुसार भारत सोडून अन्य देशांमधील क्रिकेट बोर्डाला सरकारनं करामध्ये सवलत दिली आहे. बीसीसीआयला ही सवलत नसल्यानं त्यांचं नुकसान होत आहे. यंदाचा वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) भारतामध्ये न होता यूएईमध्ये झाला, अन्यथा बीसीसीआयचे नुकसान आणखी वाढले असते.

IPL स्पर्धेतूनही फायदा

बीसीसीआयला आयपीएल स्पर्धेतून होणारी (IPL Cricket League) बीसीसीआयला अब्जावधी रूपयांची कमाई आता करमुक्त असणार आहे. या प्रकरणात झालेल्या कायदेशीर लढाईत बीसीसीआयचा विजय झाला आहे. देशात खेळाचा विशेषत: क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा आहे, त्यामुळे यावर कोणताही टॅक्स लावू नये असा बीसीसीआयचा युक्तीवाद होता. इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्यूनल (ITAT) यांनी बीसीसीआयचा हा युक्तीवाद मान्य केला आहे. बीसीसीआयला आयपीएलमधून कमाई होत असली तरी त्यांचा हेतू हा क्रिकेटचा प्रसार करणे आहे, त्यामुळे या स्पर्धेतून मिळणारी करमुक्त असेल, असा निर्णय ITAT नं दिला आहे.

Dance Deewane 3 : आसामी स्पर्धकावर Raghav Juyal चं वर्णद्वेषी वक्तव्य, क्रिकेटपटूनी केली कानउघाडणी

टॅक्स डिपार्टमेंटनं 2016-17 साली बीसीसीआयला या विषयावर नोटीस दिली होती. यामध्ये आयपीएलमधून होणाऱ्या कमाईला इन्कम टॅक्स कायदा (Income Tax Act) 12 A  अन्वये मिळणारी सवलत का रद्द करू नये? अशी विचारणा केली होती. आयपीएल हे मनोरंजनाचे माध्यम असल्याचा आयकर विभागाचा दावा होता. या नोटीशीच्या विरोधात बीसीसीआयनं ITAT चा दरवाजा ठोठावला होता.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Icc