जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ : Hitman चा भीष्म पराक्रम, हा विक्रम करणारा रोहित इतिहासातला पहिलाच भारतीय

IND vs NZ : Hitman चा भीष्म पराक्रम, हा विक्रम करणारा रोहित इतिहासातला पहिलाच भारतीय

IND vs NZ : Hitman चा भीष्म पराक्रम, हा विक्रम करणारा रोहित इतिहासातला पहिलाच भारतीय

भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर नवा विक्रम झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये (India vs New Zealand 2nd T20) रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 सिक्स मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, 19 नोव्हेंबर : भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर नवा विक्रम झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये (India vs New Zealand 2nd T20) रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 सिक्स मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये रोहितने एडम मिल्नेच्या बॉलिंगवर सिक्स मारून रोहितने या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडने 6 विकेट गमावून 153 रन केले. सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. रांचीमधली मॅच जिंकून भारताला सीरिजवरही कब्जा करण्याची संधी आहे. रोहितने 524 व्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 450 सिक्सचा टप्पा गाठला आहे. याआधी वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (Chris Gayle) आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) हा विक्रम केला आहे. गेल 553 सिक्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. गेलशिवाय दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला 500 सिक्सचा टप्पा ओलांडता आला नाही. आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आफ्रिदीने 476 सिक्स लगावले आहेत. रोहितकडे आफ्रिदीचं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. या तिघांशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 सिक्स मारता आलेल्या नाहीत. रोहित शर्माने वनडेच्या 220 इनिंगमध्ये 244 सिक्स मारल्या आहेत, तर 74 टेस्ट इनिंगमध्ये त्याच्या नावावर 63 सिक्स आहेत. रांचीमधल्या टी-20 मध्ये पहिली सिक्स मारून रोहितच्या 143 सिक्स झाल्या. रोहितच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतकं आहेत, हादेखील वर्ल्ड रेकॉर्ड आहे. पूर्णवेळ टी-20 कॅप्टन म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच सीरिज आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली आहे. या सीरिजसाठी अनेक सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात