मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: टीम इंडियातील नव्या हिटरला हिटमॅनचा सॅल्यूट, रोहितचा VIDEO VIRAL

IND vs NZ: टीम इंडियातील नव्या हिटरला हिटमॅनचा सॅल्यूट, रोहितचा VIDEO VIRAL

टीम इंडियाला (Team India) टी20 सीरिजमधील आणखी एक हिटर मिळाला आहे. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळेच भारतीय टीमला 184 रन करता आले.

  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 22 नोव्हेंबर: टीम इंडियानं (Team India) तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 मॅचमध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 73 रननं पराभव केला. 3 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलला (Axar Patel) 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मानंही त्याच्या आवडत्या मैदानात आक्रमक खेळ केला. रोहितनं 31 बॉलमध्ये पाच फोर आणि तीन सिक्सच्या मदतीनं 56 रन काढले. त्याचबरोबर टीम इंडियाला या मॅचमध्ये आणखी एक हिटर मिळाला आहे. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळेच भारतीय टीमला 184 रन करता आले.

भारतीय इनिंगमधील शेवटच्या ओव्हरमध्ये दीपक चहरनं (Deepak Chahar) जोरदार फटकेबाजी केली. त्यानं न्यूझीलंडचा फास्ट बॉलर अ‍ॅडम मिल्नेची चांगलीच धुलाई केली. मिल्नेच्या एका ओव्हरमध्ये त्यानं दोन फोर आणि एक 95 मीटर सिक्स लगावला. हा सिक्स पाहताच टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माही थक्क झाला. त्यानं चहरला सॅल्यूट केला. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दीपक चहरपूर्वी हर्षल पटेलनं (Harshal Patel) देखील आक्रमक खेळ केला. हर्षलनं 11 बॉलमध्ये 18 रन काढले. यामध्ये लॉकी फर्ग्युसनला लगावलेल्या एका जोदार सिक्सचाही समावेश आहे. हर्षल आणि दीपकच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियानं शेवटच्या पाच ओव्हरमध्ये 50 रन काढले.

इशान किशनचा बुलेट थ्रो पाहून द्रविड खूश, डग आऊटमध्ये केलं एक नंबर काम!

रोहितनं केली प्रशंसा

रोहित शर्मानं मॅचनंतर बोलताना हर्षल पटेल आणि दीपक चहरच्या बॅटींगची प्रशंसा केली. 'आम्ही मिडल ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करू शकतो. पण लोअर ऑर्डरच्या बॅटर्सनी जो खेळ केला त्यामुळे मी समाधानी आहे. तुम्ही जगभारातील टीम पाहिल्या तर त्यांच्याकडं लोअर ऑर्डरमध्ये चांगले बॅटर्स आहेत. आठव्या आणि नवव्या क्रमांकावरचे बॅटर्स महत्तवाची भूमिका बजावू शकतात. हर्षल हरयणाकडून ओपनिंग करतो. दीपकनं (Deepak Chahar) श्रीलंकेविरुद्ध चांगली बॅटींग केली होती.' याची आठवण रोहितनं करुन दिली.

First published:

Tags: Cricket news, Rohit sharma, Team india, Video viral