कोलकाता, 22 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरानंतर टीम इंडियानं दमदार पुनरागमन केलं आहे. भारतीय टीमनं जयपूर आणि रांचीमध्ये विजय मिळवल्यानंतर कोलकातामध्येही न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 73 रननं मोठा पराभव केला. रविवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं 20 ओव्हरमध्ये 184 रन केले. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडची टीम 111 रनच करू शकली. टी20 क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियानं न्यूझीलंडवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.
टीम इंडियाच्या या विजयात जबरदस्त फिल्डिंगचाही मोठा वाटा होता. या फिल्डिंगमुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) चांगलाच खूश झाला होता. भारतीय टीमची फिल्डिंग पाहून द्रविडची प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. द्रविडनं डग आऊटमध्ये फिल्डिंग कोच टी दिलीप (T. Dilip) यांची पाठ थोपटत लगेच चांगल्या कामाची पावती दिली.
कोलकातामध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी चांगली फिल्डिंग केली. पंतनं जिमी नीशमचा चांगला कॅच पकडला. नीशमनं मारलेला बॉल बराच उंच गेला होता. तो कॅच पकडताना पंत घसरला. तरीही त्यानं कॅच सोडला नाही.
या मालिकेत पहिल्यांदाच संधी मिळालेल्या इशान किशननंही दमदार फिल्डिंद केली. त्यानं सुरुवातील टीम सिफर्टला रन आऊट केले. त्यानंतर 14 व्या ओव्हरमध्ये बाऊंड्री लाईनवरून थेट थ्रो करत मिचेल स्टँनरला रन आऊट केले. इशानचा हा थ्रो पाहून द्रविड चांगलाच प्रभावित झाला. त्यानं लगेच फिल्डिंग कोचची पाठ थोपटली.
Appreciation from Rahul Dravid to the new fielding coach - T Dilip after the fantastic run-out by Ishan. pic.twitter.com/vgCcFdGKvu
— Johns. (@CricCrazyJohns) November 21, 2021
टीम इंडियाकडून अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 9 रन देत 3 विकेट घेतल्या. तर हर्षल पटेलला 2 आणि दीपक चहर, युझवेंद्र चहल, व्यंकटेश अय्यरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टीलने 36 बॉलमध्ये 51 रन केले. गप्टीलशिवाय दुसऱ्या कोणत्याही न्यूझीलंडच्या बॅटरला मोठा स्कोअर करता आला नाही.
IND vs NZ: हर्षल आणि दीपकनं दूर केली रोहितची डोकेदुखी, टीम इंडिया झाली आणखी भक्कम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ishan kishan, Rahul dravid, Team india