कोलकाता, 22 नोव्हेंबर: आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या हर्षल पटेलचं (Harshal Patel) दमदार पदार्पण हे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचं (India vs New Zealand T20 Series) वैशिष्ट्य ठरलं. हर्षलनं या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रांचीमध्ये पदार्पण केलं. त्यानं पहिल्या मॅचमध्ये भेदक बॉलिंग करत 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार पटकावला. पण, दुसऱ्या मॅचमध्ये त्याच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.
कोलकातामध्ये रविवारी झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात हर्षल 8 व्या क्रमांकावर बॅटींगला आला. त्यावेळी टीम इंडियाला मोठा स्कोअर करण्यासाठी वेगानं रन करणे आवश्यक होते. त्यानं अॅडम मिल्नेच्या बॉलवर चौकार लगावत खातं उघडलं. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टलाही चौकार लगावला. हर्षल तेवढ्यावरच थांबला नाही. त्यानं 19 व्या ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनला एक सिक्स लगावत आपण आक्रमक बॅटींग करु शकतो, हे दाखवून दिलं.
हर्षल रंगात आलेला असताना त्याच्या चुकीमुळे आऊट झाला. फर्ग्युसननं ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल पॉईंट खेळण्याच्या नादात तो हिट विकेट झाला आणि हर्षलची 17 रनची खेळी संपुष्टात आली. टी20 इंटरनॅशनलमध्ये हिट विकेट झालेला हर्षल दुसरा भारतीय आहे. यापूर्वी केएल राहुल 2018 साली श्रीलंकेविरुद्ध याच पद्धतीनं आऊट झाला होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील दुसऱ्याच मॅचमध्ये हर्षलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड झाला आहे.
— Simran (@CowCorner9) November 21, 2021
पहिल्या मॅचमध्ये 'मॅन ऑफ द मॅच'
रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये हर्षलला जखमी मोहम्मद सिराजच्या जागी (Mohammed Siraj) प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. हर्षलनं पहिल्याच मॅचमध्ये जोरदार बॉलिंग केली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 25 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या.यापूर्वी आयपीएलच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) हर्षलनं सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या.
टीम इंडियातील नव्या हिटरला हिटमॅनचा सॅल्यूट, रोहितचा VIDEO VIRAL
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india