जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: बॉलर्स मार खात असताना रोहितचं डोकं चाललं, टीम इंडियाला मिळाला टर्निंग पॉईंट

IND vs NZ: बॉलर्स मार खात असताना रोहितचं डोकं चाललं, टीम इंडियाला मिळाला टर्निंग पॉईंट

IND vs NZ: बॉलर्स मार खात असताना रोहितचं डोकं चाललं, टीम इंडियाला मिळाला टर्निंग पॉईंट

न्यूझीलंडनं दुसऱ्या टी20 मध्ये दमदार सुरूवात केली होती. जयपूरमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या मार्टीन गप्टीलची (Martin Guptill) रांचीमध्येही त्याच दिशेनं वाटचाल सुरू होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, 20 नोव्हेंबर: न्यूझीलंडनं शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये दमदार सुरूवात केली होती. जयपूरमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या मार्टीन गप्टीलची (Martin Guptill) रांचीमध्येही त्याच दिशेनं वाटचाल सुरू होती. गप्टीलनं 16 बॉलमध्ये 31 रन काढले. गप्टीलच्या आक्रमक खेळीला कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हुशार डावपेचानं ब्रेक लावला. दीपक चहरनं (Deepak Chahar) टीम इंडियाकडून पाचवी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर गप्टीललं सिक्स लगावला. त्यानंतर रोहित चहरजवळ गेला आणि त्याला पुढचा बॉल टाकण्यापूर्वी सल्ला दिला. त्याचबरोबर त्यानं फिल्डिंगमध्येही काही बदल केले. रोहितनं डीप स्क्वेअर आणि थर्ड मॅनला एक फिल्डर लावला. त्यानंतर चहरनं रोहितची सूचना आणि त्यानं लावलेल्या फिल्डिंग प्रमाणे बॉलिंग करत सलग दुसऱ्या मॅचमध्ये गप्टीलला आऊट केलं. चहरनं टाकलेला शॉर्ट बॉल गप्टीलला समजला नाही. त्यानं त्यावर फटका मारण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर ऋषभ पंतनं त्याचा सोपा कॅच पकडला. शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर होता. पण पंतनं तिथपर्यंत बॉल जाण्याच्या आधीच पळत जाऊन कॅच पकडला. रोहितच्या जाळ्यात गप्टील अडकला. न्यूझीलंडची पहिली विकेट 48 रनवर पडली. गप्टीलची विकेट हा न्यूझीलंडच्या इनिंगमधील टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर टीम इंडियानं नियमित अंतरानं विकेट्स घेत न्यूझीलंडला 6 आऊट 153 रनवर रोखलं. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनं सर्वात जास्त 34 रन काढले.पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट घेतल्या. भुवनेश्वर, दीपक चहर, अश्विन आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. डिव्हिलियर्सच्या ‘त्या’ सल्ल्यानं बदललं आयुष्य, ‘मॅन ऑफ द मॅच’ हर्षल पटेलनं सांगितलं रहस्य न्यूझीलंडने दिलेल्या 154 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुल आणि रोहित यांच्यात 13.2 ओव्हरमध्ये 117 रनची पार्टनरशीप केली. केएल राहुलने 49 बॉलमध्ये 65 आणि रोहितने 36 बॉलमध्ये 55 रन केले. ऋषभ पंतने लागोपाठ दोन सिक्स मारून भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडकडून फक्त टीम साऊदीच यशस्वी ठरला, त्याला तीन विकेट घेण्यात यश आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात