मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : चेन्नई टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ऑलराऊंडर टीममधून आऊट

IND vs ENG : चेन्नई टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ऑलराऊंडर टीममधून आऊट

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG)  याांच्यातील पहिल्या टेस्टला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला (Team India) धक्का बसला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) याांच्यातील पहिल्या टेस्टला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला (Team India) धक्का बसला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) याांच्यातील पहिल्या टेस्टला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला (Team India) धक्का बसला आहे.

    चेन्नई, 5 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG)  याांच्यातील पहिल्या  टेस्टला  सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा ऑल राऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) दुखापतीमुळे चेन्नई टेस्टमधून आऊट झाला आहे. अक्षरच्या डाव्या पायाचा गुडघा दुखावला आहे. अक्षरच्या जागी शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem) राहुल चहरचा (Rahul Chahar) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं ही माहिती दिली आहे.

    दुखापतीचं सत्र कायम

    अक्षर पटेलचा पहिल्यांदाच भारतीय टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला होता. चेन्नई टेस्टमधील अंतिम 11 मध्ये तो खेळण्याची शक्यता होती. मात्र दुखापतीमुळे त्याचं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पण लांबलं आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. आता नव्या सीरिजच्या पहिल्याच दिवशी आणखी खेळाडू दुखापत ग्रस्त झाला आहे.

    (हे वाचा-Farmers Protest : रिहानाच्या समर्थनासाठी पुढे आला पहिला भारतीय क्रिकेटपटू)

    इंग्लंडचाही एक खेळाडू आऊट

    इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉले  (Zak Crawley) मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या दोन टेस्टमधून बाहेर झाला आहे. क्रॉले याचा बुधवारीच 23 वा वाढदिवस झाला. त्याच दिवशी हॉटेलातील संगमरवरी फरशीवरुन घसरुन पडल्यानं तो दुखापतग्रस्त झाला.

    चेन्नईत भारताचा दबदबा

    भारत विरुद्ध इंग्लंड  यांच्यातील  टेस्टच्या निमित्तानं भारतामध्ये तब्बल 11 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु होत आहे.या मालिकेतील दोन टेस्ट चेन्नईमध्ये होत असून चेन्नईमध्ये भारताचा नेहमीच दबदबा राहिला आहे.

    (हे वाचा-IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध या खेळाडूची होईल सर्वाधिक चर्चा, लक्ष्मणचं भाकित)

    भारत आणि इंग्लंडमध्ये  आजवर चेन्नईत एकूण 9 टेस्ट झाल्या आहेत.यापैकी 5 टेस्ट भारतानं जिंकल्या आहेत. तर इंग्लंडनं तीन टेस्ट जिंकल्या असून एक टेस्ट ड्रॉ झाली आहे. इंग्लंडनं यापूर्वी 1985 साली चेन्नईत शेवटची टेस्ट जिंकली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईत यश मिळालेलं नाही. त्याचबरोबर चेन्नईत झालेली मालिकेतील पहिली टेस्ट देखील इंग्लंडनं कधीही जिंकलेली नाही.

    First published:

    Tags: Cricket, Team india