मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Farmers Protest : रिहानाच्या समर्थनासाठी पुढे आला पहिला भारतीय क्रिकेटपटू

Farmers Protest : रिहानाच्या समर्थनासाठी पुढे आला पहिला भारतीय क्रिकेटपटू

 दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही घेतली आहे. पॉप स्टार रिहाना (Pop Star Rihana) ने पाठिंबा दिला. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 फेब्रुवारी : दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही घेतली आहे. पॉप स्टार रिहाना (Pop Star Rihana), पॉर्न स्टार मिया खलिफा आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पॉप स्टार रिहानाच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हा भारताविरुद्ध दुष्प्रचार असल्याचं सांगितलं आहे, तर काही जणांनी रिहानाच्या ट्विटचं समर्थन केलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, प्रशिक्षक रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी प्रतिक्रिया दिली. या सगळ्यांनी शेतकऱ्यांचं हित महत्त्वाचं असल्याचं सांगतानाच देशाने एकात्मता दाखवायचं सांगितलं.

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने मात्र अप्रत्यक्षपणे रिहानाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. रिहानाचं हे ट्विट भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येत आहे. पण इरफान पठाण याने जॉर्ज फ्लॉईडची आठवण करून दिली आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर जगभरात blacklivesmatter आंदोलन झालं असल्याचं इरफान पठाण म्हणाला.

Farmers Protest : रिहानाच्या ट्विटमुळे भारतात वादळ, क्रिकेटशी आहे नातं

भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही चर्चा

भारतातल्या कृषी कायद्यांबाबत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही उमटले. टीमच्या बैठकीमध्ये प्रत्येकाने आपलं मत मांडलं, असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. असहमतीच्या या काळात एकजुटता दाखवा. शेतकरी देशाचा अविभाज्य भाग आहेत. सगळ्या पक्षकारांमध्ये सहमती होईल आणि मार्ग निघेल, असं ट्विट विराटने केलं होतं.

क्रिकेटपटू उतरले मैदानात

रिहानाच्या या ट्विटनंतर भारताचे क्रिकेटपटूही मैदानात उतरले. सचिन तेंडुलकपासून ते शिखर धवन, विराट कोहली यांच्यासारख्या अनेकांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

First published: