मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये या खेळाडूची होईल सर्वाधिक चर्चा, लक्ष्मणचं भाकीत

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये या खेळाडूची होईल सर्वाधिक चर्चा, लक्ष्मणचं भाकीत

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या सीरिजला शुक्रवार 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये शुभमन गिल (Shubhaman Gill) हा चर्चेचा केंद्रबिंदू असेल, असं मत व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने मांडलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

चेन्नई, 4 फेब्रुवारी 2021 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराज, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू हिरो बनून आले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मैदानात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या सीरिजला शुक्रवार 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. 4 टेस्ट मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या दोन मॅच चेन्नईमध्ये तर उरलेले दोन सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये शुभमन गिल (Shubhaman Gill) हा चर्चेचा केंद्रबिंदू असेल, असं मत व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने मांडलं आहे. फक्त टेस्टच नाही तर तिन्ही फॉरमॅटमध्ये गिलवर सगळ्याचं लक्ष असेल, असं लक्ष्मण स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हणाला. अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये भारताचं नेतृत्व केलं आणि टीमला विजय मिळवून दिला, पण आता विराट कोहलीचं पुन्हा एकदा टीममध्ये आगमन झाल्यामुळे त्याच्याकडेच नेतृत्व आलं आहे.

'गिलसाठी सगळं सोपं असणार नाही. आयपीएल, इंडिया ए, प्रथम श्रेणी क्रिकेट किंवा पंजाबकडून खेळताना गिलने सातत्याने कामगिरी केली आहे. त्याचे काही साथीदार पुढे गेले असतानाही त्याने धैर्याने वाट बघितली. गिल मोठ्या संधीची वाट पाहतो. ऑस्ट्रेलियामध्ये हेजलवूड, स्टार्क आणि कमिन्स यांच्यासारखे चांगले बॉलर होते. त्यांच्यासमोर ओपनिंग करणं सोपं नव्हतं. खासकरून भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर. पण त्याने आक्रमकता आणि तंत्राचा वापर करून चांगली बॅटिंग केली. गिलला त्याच्या प्रतिभेबाबत माहिती आहे,' असं वक्तव्य लक्ष्मणने केलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलने पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर टेस्टमध्ये पदार्पण केलं. त्याने 51.9 च्या सरासरीने 259 रन केले, यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

First published: