जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यातून वगळण्याच्या प्रकरणात साहानं सोडलं मौन, म्हणाला...

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यातून वगळण्याच्या प्रकरणात साहानं सोडलं मौन, म्हणाला...

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यातून वगळण्याच्या प्रकरणात साहानं सोडलं मौन, म्हणाला...

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या साहाची भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात होणाऱ्या एकमेव टेस्ट मॅचसाठी निवड करण्यात आलेली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 मे : टीम इंडियाचा विकेट किपर - बॅटर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या साहाची भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात होणाऱ्या एकमेव टेस्ट मॅचसाठी निवड करण्यात आलेली नाही. आयपीएल ‘प्ले ऑफ’ खेळण्यासाठी साहा सध्या कोलकातामध्ये आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरपूर्वी बोलताना साहानं या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्यासाठी नेहमीच वैयक्तिक कामगिरीपेक्षा टीम पहिल्यांदा आहे. मी टीम इंडियातील निवडीबाबत विचार करत नाहीय. कारण, आम्ही इथं क्वालिफायरची लढत खेळायला आलो आहोत. आमचं सर्व लक्ष या सामन्यावर आहे,’ असे साहाने सांगितले. गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील पहिली क्वालिफायर मॅच मंगळवारी होत आहे. या मॅचमध्ये विजयी होणारी टीम थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर, पराभूत टीमला आयपीएलची दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी असेल. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्या टीमची लढत लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (LSG vs RCB) या एलिमेनेटरच्या सामन्यातील विजयी टीमशी होईल.  एलिमेनेटरचा सामना बुधवारी होणार आहे. आयपीएल 2022 च्या लीग मॅचेसमध्ये गुजरातनं पहिला तर राजस्थानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्यांना ‘प्ले ऑफ’ मध्ये एका पराभवानंतरही फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव टेस्ट होणार आहे. मागच्या वर्षी न झालेल्या सीरिजची ही अखेरची मॅच आहे. कोरोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली शेवटची टेस्ट स्थगित करण्यात आली होती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. IND vs SA : टीम इंडियात निवड न झाल्याने Nitish Rana नाराज, पण नेमका निशाणा कोणावर? इंग्लंड टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात