मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : टीम इंडियात निवड न झाल्याने Nitish Rana नाराज, पण नेमका निशाणा कोणावर?

IND vs SA : टीम इंडियात निवड न झाल्याने Nitish Rana नाराज, पण नेमका निशाणा कोणावर?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी (India vs South Africa T20 Series) टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये नितीश राणाला (Nitish Rana) संधी न मिळाल्यामुळे तो नाराज झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी (India vs South Africa T20 Series) टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये नितीश राणाला (Nitish Rana) संधी न मिळाल्यामुळे तो नाराज झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी (India vs South Africa T20 Series) टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये नितीश राणाला (Nitish Rana) संधी न मिळाल्यामुळे तो नाराज झाला आहे.

मुंबई, 23 मे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी (India vs South Africa T20 Series) टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. 18 सदस्यांच्या या टीममध्ये उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या युवा खेळाडूंना निवडण्यात आलं आहे, तर काही खेळाडूंची निराशा झाली आहे. केकेआरचा स्टार बॅटर नितीश राणाही (Nitish Rana) त्यातलाच एक आहे. टीम इंडियात निवड न झाल्यामुळे नितीश राणा दुखावला आहे. सोशल मीडियावर नितीशने त्याचं दु:ख जाहीर केलं.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये नितीश राणाने केकेआरसाठी महत्त्वाच्या खेळी केल्या, तसंच तो सध्या फॉर्ममध्येही आहे. वेळ लवकरच बदलेल, असं ट्वीट नितीश राणाने केलं आहे, सोबतच त्याने भारताचा झेंडाही लावला आहे. या ट्वीटनंतर नितीश राणाला पाठिंबा मिळण्याऐवजी त्याला ट्रोल केलं जातंय. तुझ्यापेक्षा राहुल त्रिपाठी टीम इंडियामध्ये निवडण्यासाठी लायक होता, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

नितीश राणा भारताकडून 2 टी-20 मॅच खेळला, पण यात त्याला फार चमकदार कामगिरी करता आली नाही. मागच्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका दौऱ्यात राणाने टीम इंडियात पदार्पण केलं, पण यानंतर त्याला संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये राणाने 91 सामन्यांमध्ये 28 च्या सरासरीने 2181 रन केले आहेत. या मोसमात त्याने 14 मॅचमध्ये 144 च्या स्ट्राईक रेटने 361 रन केल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी केएल राहुलला टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना या सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे. तसंच दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या यांचं टीममध्ये कमबॅक झालं आहे.

दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

First published:

Tags: T20 cricket, Team india