जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / संजना गणेशनचे प्रश्न, बुमराहची उत्तरं, VIRAL होतोय हा VIDEO

संजना गणेशनचे प्रश्न, बुमराहची उत्तरं, VIRAL होतोय हा VIDEO

संजना गणेशनचे प्रश्न, बुमराहची उत्तरं, VIRAL होतोय हा VIDEO

भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड (India vs England) दौऱ्यातून माघार घेतली आहे. तिसऱ्या टेस्टनंतरच बुमराह घरी परतला. आता 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्येही बुमराह खेळणार नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या वृत्तानुसार बुमराहने (Jasprit Bumrah Marriage) लग्न करण्यासाठी ब्रेक घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 मार्च : भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड (India vs England) दौऱ्यातून माघार घेतली आहे. तिसऱ्या टेस्टनंतरच बुमराह घरी परतला. आता 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्येही बुमराह खेळणार नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या वृत्तानुसार बुमराहने (Jasprit Bumrah Marriage) लग्न करण्यासाठी ब्रेक घेतला आहे. 14 आणि 15 मार्चला गोव्यात स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) बुमराहचं लग्न होईल, असं वृत्त स्पोर्ट्सकीडाने दिलं आहे. या दोघांच्या लग्नाचा चर्चा सुरू असतानाच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोण आहे संजना गणेशन? संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. तसंच ती कोलकाता नाईट रायर्डस या आयपीएलच्या टीमसाठीही एँकरिंग करते. संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता. पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती.

बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात संजना बुमराहची मुलाखत घेत आहे. चाहत्यांनी या दोघांचा व्हिडिओ शेयर करत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा द्यायलाही सुरूवात केली आहे. याआधी बुमराहचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन सोबत जोडलं जात होतं. अनुपमाही काहीच दिवसांपूर्वी गुजरातला पोहोचली होती, त्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली. पण अनुपमा चित्रपटाच्या शूटिंगसाठी गुजरातला गेली आहे, बुमराहच्या लग्नाचा काहीही संबध नाही, असं तिच्या आईने स्पष्ट केलं. अनुपमानंतर बुमराहचं नाव स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत जोडलं जात आहे. संजनाने आयपीएलमध्ये केकेआर डायरीज नावाचा कार्यक्रमही केला. 2016 साली ती कोलकात्याच्या टीमशी जोडली गेली आणि नाईट क्लब नावाचा शोदेखील ती करायची.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात