Home /News /sport /

मैदानात कुणालाही न घाबरणारा सचिन कोरोना टेस्टच्या दरम्यान ओरडतो तेव्हा... पाहा VIDEO

मैदानात कुणालाही न घाबरणारा सचिन कोरोना टेस्टच्या दरम्यान ओरडतो तेव्हा... पाहा VIDEO

इंग्लंड लिजेंड्स विरुद्धच्या मॅचपूर्वी सचिनची (Sachin Tendulkar) कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यावेळी सचिन अचानक ओरडला. त्यामुळे मेडिकल स्टाफ चांगलाच घाबरला.

  रायपूर, 10 मार्च:  महान क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक करणारा एकमेव बॅट्समन असलेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या रायपूरमध्ये आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety world series 2021) सचिन इंडिया लिजेंड्स (India Legends) टीमचा कॅप्टन आहे. या स्पर्धेच्या दरम्यान सचिनसह सर्व क्रिकेटपटूंची कोरोना टेस्ट (Covid19 Test) करण्यात येत आहे. कोरोना टेस्ट करताना सचिन तेंडुलकरनं केलेल्या कृतीनं मेडिकल स्टाफ चांगलाच घाबरला होता. इंग्लंड लिजेंड्स विरुद्धच्या मॅचपूर्वी सचिनची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यावेळी सचिन अचानक ओरडला. आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये जगभरतील आक्रमक फास्ट बॉलर्सचा सहज सामना करणारा सचिन कोरोना टेस्ट करताना अचानक ओरडल्यानं ती टेस्ट घेणारा मेडिकल कर्मचारी चांगला घाबरला होता. सचिन ओरडला खरा पण त्याचे कारण वेगळेच होते. वास्तविक सचिननं ती टेस्ट घेणाऱ्या मेडिकल स्टाफची थट्टा केली होती. सचिनचा हा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सचिननं स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'मी 200 टेस्ट खेळल्या आहेत आणि ही 277 वी कोव्हिड टेस्ट आहे. वातावरण हलकं करण्यासाठी ही छोटी मस्करी. आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम.'
  सचिन झटपट आऊट इंग्लंड लिजेंड्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सचिनची बॅट चालली नाही. तो फक्त 9 बॉलमध्ये 9 रन काढून आऊट झाला. इंग्लंडचा स्पिनर माँटी पानेसार याने त्याला आऊट केले. सचिननं पुढे येऊन पानेसरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला पण तो बॉल टर्न झाला. त्यानंतर लगेच विकेटकिपरनं त्याला स्टंप आऊट केले. (Video : इंग्लंड विरोधात मैदानात उतरण्यापूर्वी हार्दिक पांड्याने केला बदल; विरोधी टीम थर-थर कापेल ) इंडिया लिजेंड्सला ही मॅच जिंकण्यासाठी 20 ओव्हर्समध्ये 189 रनचं टार्गेट होते. सचिनसह सेहवाग आणि युवराज लवकर आऊट झाले. त्यानंतर इरफान पठाणने 34 बॉलमध्ये नाबाद 61 रन काढत मॅच रंगतदार बनवली होती. मात्र इरफानचे हे प्रयत्न अपुरे पडले. भारताने फक्त 6 रनने ही मॅच गमावली.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Coronavirus, Covid19, Cricket news, India, Sachin tendulakar, Sports, Viral video.

  पुढील बातम्या