Home /News /sport /

IND vs ENG: पुजारा पुन्हा आला पण रहाणे बाहेरच! टीम इंडियाच्या दिग्गजाला कधी मिळणार संधी?

IND vs ENG: पुजारा पुन्हा आला पण रहाणे बाहेरच! टीम इंडियाच्या दिग्गजाला कधी मिळणार संधी?

1 जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरूद्धच्या एकमेव टेस्टसाठी चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) टीम इंडियात पुनरागन केलंय. तर अजिंक्य राहणेला (Ajinkya Rahane) संधी मिळालेली नाही.

    मुंबई, 23 मे : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या जोडीनं तब्बल एक दशक भारतीय टेस्ट टीमच्या मिडल ऑर्डरची जबाबदारी सांभाळली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर या दोघांनाही टीम इंडियातून वगळण्यात आले होते. भारत विरूद्ध श्रीलंका टेस्ट सीरिज सुरू असताना पुजारा आणि रहाणे हे दोघं फॉर्म मिळवण्यासाठी रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत होते. आता 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरूद्धच्या एकमेव टेस्टसाठी पुजारानं टीम इंडियात पुनरागन केलंय. तर राहणेला संधी मिळालेली नाही. पुजाराची निवड का? इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये पुजाराने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्याचा टीम इंडियातल्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्सकडून खेळताना पुजाराने 7 इनिंगमध्ये त्याने 143.4 च्या सरासरीने 717 रन केले, यात त्याच्या नावावर 2 द्विशतकं आणि 4 शतकांचा समावेश आहे. दुसरिकडं पुजाराचा दीर्घकालीन सहकारी आणि टीम इंडियाचा माजी व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेची टीममध्ये निवड होऊ शकली नाही. रहाणे आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळत होता. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध 14 मे रोजी झालेल्या सामन्याच्या दरम्यान त्याचे स्नायू दुखावले. त्याची दुखापत ग्रेड 3 स्वरूपातील आहे. त्यामुळे तो 8 ते 10 आठवडे क्रिकेटपासून दूर राहाणार आहे.रहाणेला या दुखापतीमुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेतील नॉक आऊट सामने खेळता येणार नाहीत. त्याचबरोबर जुलै महिन्यातील इंग्लंड विरूद्धच्या टेस्ट टीममध्येही त्याची निवड करण्यात आलेली नाही. पंजाब विरूद्धच्या पराभवानंतर SRH साठी गोड बातमी, विलियमसन बनला बाबा रहाणेचा समावेश कधी? टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी रहाणेकडं आता एकच मार्ग आहे. त्याला दुखापतीमधून बरं झाल्यानंतर 2022-23 मधील रणजी ट्रॉफी किंवा कौंटी क्रिकेटमध्ये भरपूर रन करावे लागतील. भारतीय टीम जुलै महिन्यात इंग्लंड विरूद्ध एकमेव टेस्ट मॅच खेळणार आहे. त्यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात बांगलादेश विरूद्ध टेस्ट सीरिज आहे. त्यामुळे यावर्षी रहाणेचं टेस्ट टीममधील पुनरागमन अवघड आहे. इंग्लंड टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajinkya rahane, India vs england, Pujara, Team india

    पुढील बातम्या