मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवरून मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर

IND vs ENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवरून मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर

रताचा विजय हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) साठी देखील एक गुड न्यूज आहे. या मॅचमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक खेळाडूनं सरस कामगिरी करत भारतीय टीमच्या विजयात हातभार लावला आहे.

रताचा विजय हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) साठी देखील एक गुड न्यूज आहे. या मॅचमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक खेळाडूनं सरस कामगिरी करत भारतीय टीमच्या विजयात हातभार लावला आहे.

रताचा विजय हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) साठी देखील एक गुड न्यूज आहे. या मॅचमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक खेळाडूनं सरस कामगिरी करत भारतीय टीमच्या विजयात हातभार लावला आहे.

अहमदाबाद, 19 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टी 20 मालिकेत टीम इंडियानं (Team India) पुनरागमन केलं आहे. गुरुवारी झालेल्या चौथ्या मॅचमध्ये भारताने इंग्लंडचा 8 रननं पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झालेली ही मॅच भारताने जिंकली आणि मालिकेत बरोबरी साधली. भारताचा विजय हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) साठी देखील एक गुड न्यूज आहे. या मॅचमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक खेळाडूनं सरस कामगिरी करत भारतीय टीमच्या विजयात हातभार लावला आहे.

सूर्यकुमार तळपला

सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) अर्धशतक हे भारताच्या बॅटींगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. सूर्यकुमारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅटींग करताना 28 बॉलमध्येच अर्धशतक झळकावले. रोहित, राहुल आणि विराट हे प्रमुख बॅट्समन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. त्या परिस्थितीमध्ये सूर्यकुमारनं भारताची इनिंग सावरली. त्याने आक्रमक खेळ करत रनरेट कुठेही कमी होणार नाही याची काळजी घेतली.

रोहित शर्माची कॅप्टनसी

गुरुवारच्या मॅचच्या शेवटच्या टप्प्यात रोहित शर्मानं (Rohit Sharma) कॅप्टनसी केली. नियमित कॅप्टन मैदानात नसल्याचा कोणताही परिणाम भारताच्या फिल्डिंगवर झाला नाही. त्याने बॉलर्स उत्तम हातळले. शेवटच्या ओव्हरमध्ये दबावात असलेल्या शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) मार्गदर्शन केले. भारताच्या विजयात रोहितच्या शांत कॅप्टनसीचे मोठे योगदान होते.

हार्दिकचा फिटनेस सुधारला

चौथ्या टी20 मध्ये दोन्ही टीमनं मिळून 350 पेक्षा जास्त रन झाले. बॅटींगला अनुकूल अशा पिचवर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) 4 ओव्हरमध्ये फक्त 16 रन देत 2 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याचा फिटनेस हा गेल्या वर्षभरापासून काळजीचा विषय होता. त्यामुळे तो बॉलिंगपासून दूर होता. या मालिकेत हार्दिक सातत्याने बॉलिंग करत आहे. त्याचा भारतीय टीमला फायदा होतोय. तसंच तो या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला देखील होणार आहे.

राहुल चहरचं योगदान

भारतासाठी 'करो वा मरो' असलेल्या मॅचमध्ये  राहुल चहरचा (Rahul Chahar) समावेश करण्यात आला होता. राहुलनं या मॅचमध्ये डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टो या दोघांना आऊट केले. सेट होत असलेल्या या धोकादायक बॅट्समनना निर्णायक क्षणी आऊट करत राहुलनं इंग्लंडवर दबाव वाढवला.

(हे वाचा : अहमदाबादमध्ये 'मुंबई इंडियन्स शो', भारताचा रोमांचक विजय! )

सूर्यकुमार, रोहित, हार्दिक आणि राहुल हे चार मुंबई इंडियन्सचे खेळाडू अंतिम 11 मध्ये खेळले. या चौघांनीही भारताच्या विजयात हातभार लावत फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. इशान किशननंही या मालिकेत एक अर्धशतक झळकावलं आहे. अहमदाबादच्या नरेद्र मोदी स्टेडियममध्ये या सर्वांना गवसलेला सुर हा आगामी आयपीएलचा विचार करता मुंबई इंडियन्ससाठी ही खुशखबर आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england, Mumbai Indians, Rohit sharma, Shardul Thakur, Team india