Home /News /sport /

IND vs ENG 4th T20 : अहमदाबादमध्ये 'मुंबई इंडियन्स शो', भारताचा रोमांचक विजय!

IND vs ENG 4th T20 : अहमदाबादमध्ये 'मुंबई इंडियन्स शो', भारताचा रोमांचक विजय!

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs England) 8 रनने रोमांचक विजय झाला आहे, याचसोबत भारताने 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी केली आहे. आता सीरिजची अंतिम मॅच 20 तारखेला होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंचाच शो पाहायला मिळाला.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 18 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs England) 8 रनने रोमांचक विजय झाला आहे, याचसोबत भारताने 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी केली आहे. आता सीरिजची अंतिम मॅच 20 तारखेला होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंचाच शो पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 31 बॉलमध्ये 57 रनची खेळी करत भारताला 185 रनपर्यंत पोहोचवलं. तर बॉलिंगमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि आपली पहिलीच मॅच खेळणारा राहुल चहर (Rahul Chahar) चमकले. राहुल चहरने 4 ओव्हरमध्ये 35 रन देऊन 2 विकेट घेतल्या, तर हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 16 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. शार्दुल ठाकूरला 2 आणि भुवनेश्वर कुमारला 1 विकेट घेण्यात यश आलं. मॅचच्या शेवटच्या काही ओव्हरमध्ये विराट कोहली (Virat Kohli) मैदानाबाहेर गेल्यामुळे रोहित शर्माने भारतीय टीमचं नेतृत्व करत विजय मिळवून दिला. त्यामुळे रोहितसोबत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि राहुल चहर हे चार मुंबई इंडियन्सचे खेळाडू चमकले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 23 बॉलमध्ये 46 रन, जेसन रॉयने 27 बॉलमध्ये 40 रन केले. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुल स्वस्तात माघारी परतले, पण सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत भारताला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं. कर्णधार विराट कोहलीही या मॅचमध्ये अपयशी ठरला. एक रन करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरने 18 बॉलमध्ये 37 रन तर ऋषभ पंतने 23 बॉलमध्ये 30 रन केले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 4 ओव्हरमध्ये 33 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर मार्क वूडने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 1 विकेट मिळवली. आदिल रशीद, बेन स्टोक्स आणि सॅम करन यांनाही प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा आहे. इंग्लंडने या मॅचमध्ये त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर भारताने टीममध्ये दोन बदल केले आहेत. इशान किशनऐवजी (Ishan Kishan) सूर्यकुमार यादवला तर युझवेंद्र चहलऐवजी राहुल चहरला (Rahul Chahar) संधी देण्यात आली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, T20 cricket

    पुढील बातम्या