मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /India vs England: इंग्लंडला मोठा झटका, हा ऑलराउंडर खेळणार नाही चौथी कसोटी

India vs England: इंग्लंडला मोठा झटका, हा ऑलराउंडर खेळणार नाही चौथी कसोटी

India vs England: सॅम करन भारताविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी20 सीरिजचा भाग असणार आहे. पण तो चौथ्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार नाही आहे

India vs England: सॅम करन भारताविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी20 सीरिजचा भाग असणार आहे. पण तो चौथ्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार नाही आहे

India vs England: सॅम करन भारताविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी20 सीरिजचा भाग असणार आहे. पण तो चौथ्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार नाही आहे

मुंबई, 19 फेब्रुवारी: इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम करन (Sam Curran) भारताविरोधात (India vs England) चौथ्या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही आहे. तो मर्यादित ओव्हर्सच्या टीमबरोबरच भारतात दाखल होईल. हे खेळाडू 26 फेब्रुवारी रोजी टीममधील अन्य सदस्यांसह चार्टड फ्लाइटने भारतात पोहोचणार आहेत. आधीच्या योजनेनुसार सॅम 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टेस्टमध्ये खेळताना दिसणार होता. अहमदाबादमध्ये हा सामना होणार आहे.

सॅम करन न खेळण्यामागे काय आहे कारण?

नियोजनानुसार सॅम चौथी कसोटी खेळणार होता. पण कोव्हिड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे तो हा सामना खेळू शकणार नाही आहे. कोरोना काळात प्रवासाची योजना आखणे सुरक्षित राहणार नाही, त्यामुळे इंग्लंड टीम व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

भारतानं इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट सीरिजमध्ये (IND vs ENG) जबरदस्त पुनरागमन केलं. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 227 रननं पराभव केला. दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं इंग्लंडचा 317 रननं पराभव करत मागील पराभवाची परतफेड केली आहे. भारतानं दिलेलं 482 रनचं आव्हान इंग्लंडला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम फक्त 164 रनवर आटोपली. दरम्यान तिसरी कसोटी 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून चौथा आणि शेवटचा सामना मोटेरा स्टेडियममध्ये होणार आहे.

(हे वाचा-सचिनच्या अर्जुनचं IPLमध्ये पदार्पण! ‘या’ टीमकडून खेळणार T20)

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्रॉली, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डोम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स, मार्क वुड

(हे वाचा-7 वर्षानंतर ‘हा’ चॅम्पियन खेळणार IPL,टाळ्याच्या गजरात सर्वांनी केलं स्वागत VIDEO)

इंग्लंडची टी-20 टीम

ऑयन मोर्गन (कर्णधार), मोईल अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिसी टोपले. मार्क वुड.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, India vs england