चेन्नई, 18 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सिझनसाठीच्या (IPL 2021) लिलावात पूर्वीच्या अनेक ट्रेंडला ब्रेक लागला आहे. जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स या धडाकेबाज खेळाडूंना यंदा कुणीही खरेदी केलं नाही. त्याचवेळी तब्बल सात वर्षांनी भारताच्या एका चॅम्पियन खेळाडूचं पुनरागमन झालं आहे.
टेस्ट स्पेशालिस्ट असा शिक्का बसलेल्या चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) पुजाराला 50 लाखांच्या बेस प्राईजला खरेदी केलं. पुजाराला चेन्नईनं खरेदी करताच सर्वच आयपीएल फ्रँचायझींनी टाळ्या वाजवून चेन्नईचं अभिनंदन केलं.
A round of applause 👏🏻 at the @Vivo_India #IPLAuction as @cheteshwar1 is SOLD to @ChennaiIPL. pic.twitter.com/EmdHxdqdTJ
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
पुजारा 2014 मध्ये शेवटचं आयपीएल खेळला होता. त्यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबनं त्याला बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. त्या सिझममध्ये पुजारानं 20.53 च्या सरासरीनं 99.74 च्या स्ट्राईक रेटनं 390 रन केले. त्यानंतर प्रत्येक वर्षी तो अनसोल्ड ठरला होता.
आयपीएलमध्ये सात वर्षांनी पुनरागमन करणारा पुजारा सध्या भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्टची तयारी करत आहे. दोन्ही देशांमधील तिसरी टेस्ट मॅच 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. या मालिकेत सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमनं एक-एक टेस्ट जिंकली आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टला मोठं महत्व आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Ipl 2021 auction