मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021 Live : सचिनच्या अर्जुनचं आयपीएलमध्ये पदार्पण! ‘या’ टीमकडून खेळणार T20

IPL Auction 2021 Live : सचिनच्या अर्जुनचं आयपीएलमध्ये पदार्पण! ‘या’ टीमकडून खेळणार T20

Arjun Tendulkar IPL Auction 2021: अर्जुनने 2018 साली भारताच्या अंडर-19 टीमसाठी पदार्पण केलं होतं, पण सीनियर टीममध्ये येण्यासाठी त्याला दोन वर्षांची वाट पाहावी लागली. या काळात अर्जुन इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटही खेळला.

  चेन्नई, 18 फेब्रुवारी :  महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरनं आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. अर्जुननं यंदा पहिल्यांदाच आयपीएल लिलावासाठी नाव नोंदवले होते. त्याला मुंबई इंडियन्सनं 20 लाखांना खरेदी केलं आहे.

  अर्जुननं यंदा पहिल्यांदाच आयपीएल लिलावासाठी नाव नोंदवले होते. अर्जुननं मागील महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली (Sayed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेतून सिनियर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हरियाणाविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ची मुंबईच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये निवड झाली. अर्जुनने 2018 साली भारताच्या अंडर-19 टीमसाठी पदार्पण केलं होतं, पण सीनियर टीममध्ये येण्यासाठी त्याला दोन वर्षांची वाट पाहावी लागली. या काळात अर्जुन इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटही खेळला.

  पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनला चकमदार कामगिरी करता आली नाही. या मॅचमध्ये त्याला फक्त एक विकेट मिळाली. पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करत असताना अर्जुनने चैतन्य बिष्णोईला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अर्जुनच्या बॉलिंगवर विकेट कीपर आदित्य तरेने चैतन्य बिष्णोईचा कॅच पकडला. या मॅचमध्ये अर्जुन मुंबईचा सगळ्यात महागडा बॉलर ठरला. अर्जुनने 3 ओव्हरमध्ये 34 रन दिले.

  IPL Auction 2021 : मुंबई इंडियन्स झाली आणखी पॉवरफुल, आले 2 नवे खेळाडू!

  ‘या’ कामगिरीमुळे झाली निवड

  अर्जुननं 73 व्या पोलीस निमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत (Police Invitation Shield Cricket Tournament 2020-2021) फक्त 31 बॉलमध्ये नाबाद 77 रनची आक्रमक खेळी केली. विशेष म्हणजे त्यानं यावेळी एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स लगावले होते. त्यानंतर 41 रन देऊन तीन विकेट्सही घेतल्या. अर्जुनच्या या कामगिरीच्या जोरावर एनआयजी क्रिकेट क्लबनं (MIG Cricket Club) इस्लाम जिमखान्याचा 194 रननं दणदणीत पराभव केला. त्याची ही कामगिरीच आयपीएल फ्रँचायझीचं लक्ष वेधून घेण्यासाठी निर्णायक ठरली आहे.

  अवघ्या 37 चेंडूत झळकावले शतक, कोणत्या संघात मिळणार 'या' धडाकेबाज खेळाडूला संधी?

  21 वर्षाच्या अर्जुननं त्याच्या खेळात पाच फोर आणि आठ सिक्स लगावले होते. त्यानं ऑफ स्पिनर हाशिर दाफेदारच्या एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स लगावले.

  First published:
  top videos

   Tags: Arjun Tendulkar, IPL 2021, Ipl 2021 auction, Sachin tendulkar