• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली करणार तिसऱ्या मॅचची ओपनिंग, 2 वर्षांनी कोलकातामध्ये होणार मॅच

IND vs NZ: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली करणार तिसऱ्या मॅचची ओपनिंग, 2 वर्षांनी कोलकातामध्ये होणार मॅच

तब्बल दोन वर्षांनंतर कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मॅच होणार आहे. BCCI अध्यक्ष आणि 'प्रिन्स ऑफ कोलकाता' सौरव गांगुली या मॅचची ओपनिंग करणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand 2021) यांच्यात सध्या 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर रविवारी होणार आहे. टीम इंडियानं या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामनाही जिंकत क्लीन स्वीप करण्याची संधी भारतीय टीमला आहे. यापूर्वी दोन देशांमध्ये मागच्या वर्षी झालेली 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतही टीम इंडियानं क्लीन स्वीप मिळवला होता. तब्बल दोन वर्षांनंतर कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मॅच होणार आहे. यापूर्वी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 2019 साली इथं डे-नाईट टेस्ट झाली होती. हा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांनाही परवनागी देण्यात आली आहे. त्यातच क्रिकेट फॅन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. BCCI अध्यक्ष आणि 'प्रिन्स ऑफ कोलकाता' सौरव गांगुली या मॅचची ओपनिंग करणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार गांगुली तिसऱ्या मॅचमध्ये घंटी वाजवून मॅचची सुरूवात करेल. टीम इंडियाचे एकतर्फी विजय टी20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं 8 विकेट्सनं पराभव केल्यानं टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. भारतीय टीमनं या पराभवाचा बदला घेतला आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने टीम इंडियानं एकतर्फी जिंकले आहेत. बुधवारी जयपूरमध्ये 5 विकेट्सनं विजय मिळवल्यानंतर टीम इंडियानं रांचीमधील मॅचही 7 विकेट्सनं जिंकली आहे. IND vs NZ: शेवटच्या मॅचमध्ये कशी असेल Playing11? मालिका जिंकल्यानंतर रोहितनं दिलं उत्तर न्यूझीलंडने दिलेल्या 154 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राहुल आणि रोहित यांच्यात 13.2 ओव्हरमध्ये 117 रनची पार्टनरशीप केली. केएल राहुलने 49 बॉलमध्ये 65 आणि रोहितने 36 बॉलमध्ये 55 रन केले. ऋषभ पंतने लागोपाठ दोन सिक्स मारून भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडकडून फक्त टीम साऊदीच यशस्वी ठरला, त्याला तीन विकेट घेण्यात यश आलं.
  Published by:News18 Desk
  First published: