भारतीयांवर जळणाऱ्या माजी कॅप्टनचा विल्यमसनच्या खांद्यांवरुन कोहलीवर निशाणा

भारतीयांवर जळणाऱ्या माजी कॅप्टनचा विल्यमसनच्या खांद्यांवरुन कोहलीवर निशाणा

टीम इंडियानं (Team India) गेल्या काही वर्षात सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) भारतीय क्रिकेट टीम सलग पाच वर्ष नंबर वन आहे

  • Share this:

मुंबई, 14 मे : टीम इंडियानं (Team India) गेल्या काही वर्षात सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) भारतीय क्रिकेट टीम सलग पाच वर्ष नंबर वन आहे. गेल्या सहा महिन्यात या टीमनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली. त्यानंतर इंग्लंडला मायदेशात 3-1 या फरकानं सहज हरवलं. भारतीय टीमच्या या यशावर काही विदेशी खेळाडू नेहमी जळतात. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) हा यापैकी एक आहे.

मायकल वॉन नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करत असतो. त्यानं पुन्हा एकदा तेच केलंय. पण, वॉननं यंदा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन  (Kane Williamson) याच्या खांद्यावरुन टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) निशाणा साधला आहे. 'विल्यमसन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला असता, पण विराट कोहली असेपर्यंत तो कधीही सर्वोत्तम खेळाडू ठरणार नाही, कारण तो भारतीय नाही,' असं वॉननं म्हंटलं आहे.

' माझ्या मते विल्यमसन तीन्ही प्रकारात सर्वोत्तम आहे. पण तो विराट कोहलीची बरोबरी करु शकत नाही. कारण, त्याचे इन्स्टाग्रामवर 100 मिलिअन फॉलोअर्स नाहीत, त्याच्याकडं जाहिराती नाहीत. त्यामुळे तो भक्कम कमाई करत नाही. सर्व जण विराटबद्दल चांगलं बोलतात. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढतात. विल्यमसन ज्या पद्धतीनं खेळतो. मैदानावर त्याचं वर्तन शांत आणि संयमी असते. ही खरंच कमाल आहे.' असा दावा वॉननं केला आहे.

कोरोनाच्या लढाईतही विराटनं केलं टार्गेट पूर्ण, 7 दिवसांमध्ये जमवले इतके पैसे

विल्यमसन जास्त रन करेल...

इंग्लंडचा माजी कॅप्टन एवढ्यावरच थांबला नाही. इंग्लंड दौऱ्यात विल्यमसन कोहलीपेक्षा जास्त रन करेल, असा दावा त्यानं केला आहे. 'विराट कोहली इंग्लंडमध्ये रन काढण्यासाठी नेहमी संघर्ष करतो. त्याला इंग्लंडच्या स्विंग आणि सीम पिचवर रन काढणे अवघड होते. विल्यमसन इथं सरस आहे.  विल्यमसन आगामी इंग्लंड दौऱ्यात  विराटपेक्षा जास्त रन काढेल अशी मला खात्री आहे."

न्यूझीलंड जून महिन्यात इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट खेळणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर भारतीय टीम इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका खेळणार आहे.

Published by: News18 Desk
First published: May 14, 2021, 4:28 PM IST

ताज्या बातम्या