जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोरोनाच्या लढाईतही विराटनं केलं टार्गेट पूर्ण, 7 दिवसांमध्ये जमवले इतके पैसे

कोरोनाच्या लढाईतही विराटनं केलं टार्गेट पूर्ण, 7 दिवसांमध्ये जमवले इतके पैसे

कोरोनाच्या लढाईतही विराटनं केलं टार्गेट पूर्ण, 7 दिवसांमध्ये जमवले इतके पैसे

कोरोनाविरुद्धच्या लढाईत समाजातील प्रत्येक जण आपल्यापरीनं मदत करत आहे. यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anuska Sharma) यांचा देखील समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 मे : कोरोना व्हायरसच्या (corona virus) दुसऱ्या लाटेचा सध्या भारत सामना करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत समाजातील प्रत्येक जण आपल्यापरीनं मदत करत आहे. यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anuska Sharma) यांचा देखील समावेश आहे. या जोडप्यानं कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 7 मे पासून अभियान चालवलं. यामध्ये त्यांनी आठवडाभराच्या आताच 11 कोटी जमा केले आहेत. विराट आणि अनुष्का यांनी देखाल या मोहिमेसाठी  त्यांच्याकडून दोन कोटी रुपये दान केले आहेत. विराट आणि अनुष्कानं या मोहिमेसाठी सुरुवातीला 7 कोटी जमा करण्याचं टार्गेट ठेवलं होतं. पण, या अभियानाला मिळालेला प्रतिसाद पाहून हे लक्ष्य 11 कोटी करण्याचं ठरवलं. विराटनं हे अभियान समाप्त होताच लोकांचे ट्विट करुन आभार मानले आहेत. विराटनं सांगितलं की, “माझ्याकडं भावना व्यक्त करण्यासाठी शब्द कमी आहेत. आम्ही आमचं लक्ष्य एकदा नाही तर दोनदा पूर्ण केलं. या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार. ज्या व्यक्तींनी यामध्ये कोणत्याही प्रकारे दान केले असेल त्यांचे आभार व्यक्त करतो.

जाहिरात

अनुष्का शर्मानं देखील कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले आहे. “या चांगल्या कामासाठी तुम्ही जी एकजूट दाखवली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आम्ही सुरुवातीचे लक्ष्य पूर्ण केले हे सांगायला मला अभिमान आहे. आयुष्य वाचवण्यासाठी याची मदत होईल. भारतीय लोकांसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.”

जाहिरात

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या या अभियानाला एमपीएल स्पोर्ट्स फाऊंडेशनने सर्वाधिक पाच कोटी रुपयांची मदत केली आहे. यानंतर विराटने ट्वीट करून फाऊंडेशनचे आभार मानले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात